राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी निवडसाठी 29 डिसेंबर 2024 रोजी ईच्छुकांच्या मुलाखती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी निवडसाठी 29 डिसेंबर 2024 रोजी ईच्छुकांच्या मुलाखती

नंदुरबार(प्रतिनिधी) सुरेश सुतार नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका व शहराध्यक्षपदाची निवड करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून येत्या 29 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता नंदुरबार येथील सेंट मदर टेरेसा शाळेत निवड समितीच्यावतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

या निवड समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे, भरत गावित, रतनदादा पाडवी, अली मोहम्म़द मक्राणी, निखिलभाई तुरखिया, सुरेंद्र कुवर व माधवमामा चौधरी यांचा समावेश असून या निवड समितीचे सदस्य जिल्हा कार्यकारिणी,तालुका व शहराध्यक्षांची निवड करतील.त्यामुळे इच्छूकांनी रविवारी 29 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील सेंट मदर टेरेसा शाळेत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी केले आहे. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीसह तालुका व शहर कार्यकारिणी बरखास्त़ करण्यात आली होती. पक्ष बांधण्यासाठी नव्या व कार्यक्षम कार्यकर्त्यांची कार्यकारिणीत निवड करण्यात येणार आहे.,असेही ते म्हणाले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.