शुभ प्रसंगाला आली; मुंबई बघण्यासाठी गेली, समुद्रातली ‘फेरी’ मावशीच्या जीवावर बेतली

नालासोपारा येथून भाच्यासोबत मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या मावशी व बहिणीपैकी मावशीचा दुर्दैवी अंत मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या प्रवासी बोट दुर्घटनेत झाला आहे. रामलता देवी गुप्ता असे मृत महिलेचे नाव आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या प्रवासी बोट दुर्घटनेत आतापर्यंत १४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील गुप्ता कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नालासोपारा येथून भाच्यासोबत मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या मावशी व बहिणीपैकी मावशीचा दुर्दैवी अंत या दुर्घटनेत झाला आहे. रामलता देवी गुप्ता असे मृत महिलेचे नाव आहे.  नालासोपारा येथे राहणारा गौतम गुप्ता (वय 25) याचे 12 डिसेंबर रोजी लग्न होते. गौतम याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशातील गाजीपुर जिल्ह्यातून त्याची मावशी रामलता देवी गुप्ता (वय 55) नालासोपारा येथे आल्या होत्या.लग्नकार्य उत्साहात पार पडले. त्यानंतर गौतम, त्याची मावशी रामलाता देवी व बहिण निमता देवी गुप्ता (वय 30) या दोघींना फिरण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया व एलिफंटा परिसरात गेला होता. गौतम, त्याची मावशी व बहिण असे हे तीघेजण दुपारी तीन वाजताच्या सुमारास बोटीत बसले. त्याचवेळी स्पीड बोट, हे तिघेही असलेल्या प्रवासी बोटीला धडकली व भीषण असा अपघात घडला.

स्पीड बोट धडकल्यानंतर प्रवाशांनी एकापाठोपाठ एक लाईफ जॅकेट घालण्यास सुरुवात केली. गौतमने घाईघाईत प्रथम बहिणीला आणि मावशीला लाईफ जॅकेट दिले त्याचप्रमाणे इतरांनाही लाईफ जॅकेट दिले. एकमेकांचे प्राण वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या भयानक परिस्थितीत त्याची मावशी त्याच्यापासून वेगळी झाली. गौतम बहिणीला घेऊन दुसऱ्या बोटी जवळ गेला व बोटीतील इतर दोघांनाही वर खेचून घेतले. मावशीने लाईफ जॅकेट घातले असल्याने तिचा जीव वाचणारच अशा मनस्थितीत गौतम होता. मात्र गौतमची मावशी रामलता देवी त्याच्यापासून दूर झाली ती कायमचीच. रामलता देवी यांचा बोट दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला.भाच्याचे लग्न आनंदात पार पाडून मावशीला मुंबई फिरवण्यासाठी घेऊन गेलेल्या गौतमला स्वप्नातही वाटले नव्हते की इतक्या दुर्दैवी घटनेला त्यास सामोरे जावे लागेल. बहिणीला वाचवले मात्र मावशीला वाचवू शकलो नाही याची खंत गौतमला सतावत आहे. रामलता देवी यांच्या मृत्यूमुळे गौतम व त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.