पुणे पोलिसांना मोठं यश, पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपीला अटक.

 पुण्यातील कात्रजमध्ये दोन तरुणांवर कोयत्याने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार अमोल आडमला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. आरोपी सोलापूरला पळून जाण्याच्या तयारीत होता. १७ डिसेंबर रोजी साईनगर गल्लीत सात जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला होता. आडमवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. अशातच कात्रज परिसरात दोघा तरुणांवर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्यानंतर सोलापूरला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी शिताफीने अटक केली. अमोल रवी आडम (वय २४, रा. आगम मंदिर, कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. कात्रज येथील साईनगर गल्ली क्रमांक तीन येथे सात जणांच्या टोळक्याने तरुणांवर वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. ही घटना १७ डिसेंबरला रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी समर्थ राकेश साळुंखे (वय १८, रा. कात्रज) याने दिलेल्या तक्रारीवरून आंबेगाव पोलिस ठाण्यात (भारती विद्यापीठ पोलिस) गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याचा मित्र इशांत कोकाटे आरोपींनी केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपींनी ‘तू आम्हाला जाब विचारणारा कोण, असे बोलून आरोपींनी तक्रारदाराला मारहाण केली. आडमने कोयत्याने तक्रारदाराच्या मित्राच्या मानेवर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्या वेळी तक्रारदार जीव वाचविण्यासाठी पळताना पाय घसरून पडले. तेव्हा आरोपीने तक्रारदाराच्या डोक्यावर, हातावर आणि अंगावर कोयत्याने वार केले. यात तक्रारदार आणि त्यांचा मित्र गंभीर जखमी झाले. त्यानंतर टोळके पसार झाले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपी आडम पुणे सोडून मूळ गावी सोलापूरला पळण्याच्या तयारीत होता. ही माहिती स्वारगेट पोलिस ठाण्यातील अंमलदार कुंदन शिंदे आणि तांबे यांना मिळाली. स्वारगेट पोलिसांनी एसटी स्थानकात सापळा लावून आडमला पकडले आणि त्याला आंबेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस अंमलदार शंकर संपते, सागर केकाण, कुंदन शिंदे, राहुल तांबे, श्रीधर पाटील, सुधीर इंगळे, सतीश कुंभार, विक्रम सावंत आदींनी केली. आरोपी अमोल आडमवर भारती विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा इत्यादी पोलिस ठाण्यात अपहरण, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत यांसारखे अतिगंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.