अल्पसंख्यांक दिन साजरा – डी.एस. देशमुख विद्यालय, थोरगव्हाण येथे विशेष कार्यक्रम आयोजित केला .

अल्पसंख्यांक दिन साजरा – डी.एस. देशमुख विद्यालय, थोरगव्हाण येथे विशेष कार्यक्रम आयोजित केला .

भुसावळ प्रातिनिधी युवराज कुरकुरे अल्पसंख्यांक विद्यार्थी आणि विद्यार्थीनी विद्यालयात आहे . यांचे साठी तसेच लोकशाही धर्मनिरपेक्ष मूल विद्यार्थ्या अंगी रूजपण्यासाठी थोरगव्हाण, दि. 18 डिसेंबर: भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक म्हणून दरवर्षी साजरा होणारा अल्पसंख्यांक दिन यंदा थोरगव्हाण येथील डी.एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विशेष उत्साहाने साजरा करण्यात आला. दी एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण (स्थापना 1917) संचालित या विद्यालयात या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय समिती सदस्य मधुकर कोल्हे यांनी भूषवले. प्रसंगी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला . उपस्थित मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी गुच्छ देवून स्वागत केले. यानंतर टी पी घुले यांनी अल्पसंख्यांक दिनाचे महत्त्व, त्याचे उद्दिष्ट, आणि अल्पसंख्यांक समाजाच्या हक्कांविषयी , शिष्यवृत्ती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी सांगितलेकीकार्यक्रमादरम्यान अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी विचार मांडले गेले. शाळेच्या वतीने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षी शैक्षणिक उपक्रम राबवण्याची ग्वाही देण्यात आली.

कार्यक्रमात विविध शैक्षणिक आणि सामाजिक माहीती देण्यातआली. यामध्ये विद्यार्थ्यांना संविधानातील कलम 29 आणि 30 चे महत्त्व आणि अल्पसंख्यांक समुदायांना दिलेल्या हक्कांविषयी माहिती देण्यात आली. अध्यक्षीय भाषणात मधुकर कोल्हे यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांच्या योगदानाची गरज अधोरेखित केली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रोत्साहित केले. शेवटी, कार्यक्रमाचा समारोप शाळेच्या शिक्षक-विद्यार्थ्यांनी एकत्रीतपणे समता आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या गीताने केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक डी के पाटील शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या माध्यमातून विविधतेचा सन्मान, अल्पसंख्यांकांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार, आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून आला . कार्यक्रमाची प्रस्तावना सुत्रसंचालन वाङ् मय मंडळाचे वाय जे कुरकुुरे यांनी केले .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.