पेनाच टोपण तोंडात गेलं, शिक्षकांनी पाहिलं पण काही कळायच्या आत नको ते घडलं; पालकांनो मुलांकडे लक्ष द्या

पेनाच टोपण तोंडात गेलं, शिक्षकांनी पाहिलं पण काही कळायच्या आत नको ते घडलं; पालकांनो मुलांकडे लक्ष द्या

धुळे : धुळे तालुक्यातील निमखेडी गावात गुरुवारी दुपारी पेनाचं टोपण घशात अडकल्याने सात वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत विद्यार्थिनीचं नाव अर्चना खैरनार (वय ७) असून, ती निमखेडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होती.

गुरुवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अर्चना अभ्यास करत असताना तिने पेनाचं टोपण तोंडात धरलं होतं. अचानक ते टोपण तिच्या घशात अडकलं, त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पाठीवर थपथपी मारून टोपण काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न असफल ठरल्यानंतर अर्चनाला नातेवाईक आणि शिक्षकांच्या मदतीने धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, श्वास गुदमरल्याने रुग्णालयातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, शाळा परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. अर्चनाच्या आकस्मिक मृत्यूने शिक्षक, सहकारी विद्यार्थी आणि पालक यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.मुख्याध्यापक सुहास जैन यांनी अर्चनाबद्दल दुःख व्यक्त करताना ती अतिशय हुशार विद्यार्थिनी असल्याचं सांगितलं. या घटनेने मुलांच्या सुरक्षिततेबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित केली आहे. पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या सवयींकडे अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.