पैशांचा पाऊस पाडून दाखवतो सांगत सोबत नेलं अन् मग जंगलात भलतंच घडलं

पैशांचा पाऊस पाडून दाखवतो सांगत सोबत नेलं अन् मग जंगलात भलतंच घडलं

धुळे: शिरपूर येथील पळासनेरच्या जंगलामध्ये पैशांचा पाऊस पाडून देतो असं खोटं सांगत दीड लाख रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यादरम्यान, आरोपींनी पैसे परत न देता बंदुकीतून दोन राउंड फायर केल्याचे देखील उघडकीस आलं आहे. या घटनेतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आणि सांगवी पोलिसांनी मध्य प्रदेशातून चार आरोपींच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. पैशांचा पाऊस आम्ही पाडू शकतो, त्यासाठी पैसे लागतील असे आमिष दाखवत फसवणूक केल्याचा अजब प्रकार शिरपूर तालुक्यातील पळासनेर शिवारातील जंगलात घडल्याचे समोर आले आहे. पळासनेर शिवारातील जंगलात शेतकरी गुलजारसिंग पावरा आणि त्याचा साथीदार या दोघांना नेण्यात आले. याठिकाणी पैशांचा पाऊ पाडून दाखवतो, मात्र त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगण्यात आले. त्यासाठी पैसेही घेण्यात आले. बराचवेळ होऊन देखील कोणत्याही प्रकारचा पैशांचा पाऊस पडला नाही. हा प्रकार शनिवारी (१४ ऑगस्ट) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. पैसे देऊनही पाऊस न पडल्यामुळे आमचे पैसे परत करा असे शेतकऱ्यांनी सांगितलं. त्याचा राग आल्याने शेतकऱ्यांना शिवीगाळ करत पिस्तूल रोखण्यात आली. शेतकऱ्यासह त्याच्या साथीदारावर गोळी झाडण्यात आली. मात्र, अंधार असल्याने आणि गोळी शेतकऱ्याला लागली नाही आणि सुदैवाने शेतकऱ्यासह त्याच्या साथीदाराचा जीव वाचला. मात्र आपण पकडले जाऊ या भितीने आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला.

या घटनेची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना कळताच पोलिस निरीक्षक जयपाल हिरे आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनाही माहिती कळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना घटनास्थळी रवाना केले. पवार व त्यांच्या पथकाने घटनास्थळी शोध सुरु केला.
मध्यप्रदेशातील सरहद्दीतून चार जणांना ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. तर पोलीस येत असल्याचा अंदाज येताच एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहेत. गुलजारसिंग पारसिंग पावरा (वय ५७, रा. सलईपाडा, पोस्ट बोराडी ता. शिरपूर) या शेतकऱ्याने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी बीएनएस १०९, ३ (५) भारतीय हत्यार कायदा कलम ५/२७ (१) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.पैशांचा पाऊस झालाच नाही  गुलजारसिंग पावरा याने बराच प्रयत्न करुनही पैशाचा पाऊस पडलाच नाही. पैशाचा पाऊस पडत नसल्याचे पाहून गणेश चौरे याने गुलजारसिंग पावरा याच्याकडून दिलेले दीड लाख रुपये परत मागितले. तेव्हा गुलजारसिंग याने दीड लाखा पैकी फक्त ५० हजार रुपये परत केले. त्यावर गणेश चौरे व त्याचे साथीदार अशांनी पूर्ण पैसे परत करा असा हट्ट धरला. त्यात त्यांच्यात आपसात वाद झाला. गुलजारसिंग पैसे परत करत नाही हे पाहून गणेश सोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीने त्याच्या जवळ असलेल्या बंदुकीने फायर करुन गुलजारसिंग व त्याचा जोडीदार शिवा याना जिवे ठार मारण्याचा उद्देशाने फायर करुन मारेकरी घटनास्थळाहून फरार झालेत.

  • Related Posts

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    एका डॉक्टरनेच ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कार घुसवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरने केलेल्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तालेब याने भर…

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    एका डिलिव्हरी बॉयने पार्सल देताच स्फोट झाला. या स्फोटात डिलिव्हरी बॉय आणि पार्सल घेणारी व्यक्ती जखमी झाली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले असून, जुन्या वैमनस्यातून हा स्फोट घडवल्याचा संशय आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न