धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांनी त्यांच्या अकाउंटंट नीलेश अग्रवाल विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे. धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांनी त्यांच्या अकाउंटंट नीलेश अग्रवाल विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे. बनावट सह्या व नोंदी करून 51 लाख 50 हजारांची रक्कम नीलेश अग्रवालने परस्पर खात्यात काढून घेत गैरव्यवहार केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. आमदार अनुप अग्रवाल यांचे वडील ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार, नरेशकुमार अँण्ड कंपनी आणि गणेश एंटरप्रायजेस या भागीदारीमध्ये असलेल्या फर्म आहे. त्यांचे गरुड बाग येथील धुळे विकास सहकारी बँकेत करंटं खाते आहे. अग्रवाल कुटुंबीयांनी नीलेश कचरूलाल अग्रवाल यांच्याकडे अकाउंटंट म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्याचा गैरफायदा घेत नीलेश अग्रवाल यांनी बँक खात्याच्या चेकबुकचा दुरुपयोग केला. शिवाय त्यावर बनावट सह्या करून सुमारे 51 लाख 50 हजार रुपये परस्पर काढून घेतले.










