काळ्या स्कॉर्पिओची रांग, ५०-६० गुंड अन् गावकऱ्यांना धमकी; बीडनंतर धाराशिवमध्ये पवनचक्कीवरुन दहशत

बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता धाराशिव येथेही पवनचक्कीवरुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. पवनचक्कीच्या वादातून ही हत्येची घटना घडली होती. त्यानंतर आता धाराशिवमध्येही धमकावल्याची घटना समोर आली आहे. धाराशिवमध्ये पवनचक्की ठेकेदारांकडून दहशत माजवल्याचा प्रकार घडला आहे. तुळजापुरातील मेसाई जवळगा या गावात रिन्यू कंपनीच्या पवनचक्की उभारणीच्या कामाला गावकऱ्यांनी नकार दिला होता. त्यानंतर काही लोकांनी येत गावकऱ्यांनी धमकावल्याचं समोर आलं आहे.

अचानक गावात १६ ते १७ काळ्या स्कॉर्पिओ गाड्या आल्या. त्यातून ५०-६० बाऊन्सर्स गावात दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांना धमकावल्याची माहिती आहे. गावभर ही गुंडगिरी सुरु होती. पोलिसांत तक्रार देऊनही पोलीस घटनास्थळी आले नाही. त्यामुळे अखेर भाजपचे स्थानिक पदाधिकारी विशाल रोचकारी यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर प्रकरण शांत झालं. पण, या घटनेने गावात आता दहशत पसरली आहे. या गुंडांकडून पोलिसांच्या मदतीनेच गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यांना बळजबरीने गावात पवनचक्क्या उभारायच्या असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. त्याबाबतची तक्रारही धाराशिव पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आल्याची माहिती आहे. या ठेकेदारांच्या दहशतीने हे गावकरी धास्तावले आहेत. त्यामुळे गावात सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे. बीडसारखी घटना धाराशिवमध्ये घडू नये, अशी भीती गावकऱ्यांना आहे.”२९ तारखेला जगताप परिवार आणि तिथल्या सरपंचांनी मला फोन केला आणि सांगितलं की रेन्यू कंपनीचे काही लोक शेतात येऊन गोंधळ करत आहेत. तुम्ही लवकर या. मी पोहोचलो तेव्हा, १६ ते १७ काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ ५०-६० गुंड ज्यांच्या हातात चैन वगैरे होत्या. ते म्हणाले की कंपनीचे गुत्तेदार आहे. मी म्हटलं कंपनी, तुम्ही आणि शेतकऱ्याचा काय संबंध आहे. द्राक्षाच्या बागेत हे लोक गुंडगिरी करत होते. शेतकऱ्यांनी त्यांचा प्रयत्न हानून पाडला. तुम्ही कुठलेही असले तरी आम्ही तुम्हाला तुळजापूरच्या शेतकऱ्यांवर अन्याय करु देणार नाही”, अशी माहिती भाजप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.