सातारा शहरातील कन्या शाळेत दहावीमध्ये शिकत असलेली अक्षदा देशमुख (वय १५, रा. यादव गोपाळ पेठ) या मुलीचा शाळेमध्ये कबड्डी खेळाचा सराव करत असताना पडल्यामुळे डोक्याला मार लागल्याने बेशुद्ध पडली होती सातारा शहरातील प्रसिद्ध असलेल्या कन्या शाळेतील विद्यार्थिनी अक्षदा विजय देशमुख (वय १५) ही शाळेच्या वेळेत नियमित कबड्डीचा सराव करत असताना पडून जखमी झाली होती. यावेळी तिच्या डोक्याला मार लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी सांगितले की, सातारा शहरातील कन्या शाळेत दहावीमध्ये शिकत असलेली अक्षदा देशमुख (वय १५, रा. यादव गोपाळ पेठ) या मुलीचा शाळेमध्ये कबड्डी खेळाचा सराव करत असताना पडल्यामुळे डोक्याला मार लागल्याने बेशुद्ध पडली होती. यावेळी तिच्या नाकातून रक्त येत होते. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. यावेळी तिला शाळेतील शिक्षकांनी तिला प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी सांगण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी पाटील यांनी तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेनं शाळा प्रशासन पुरते हादरुन गेले आहे.










