भाजप नेत्यावर अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल होताच फरार

भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षावर 23 वर्षीय तरुणीवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सोलंकी फरार झाला असून त्याने पक्षाचा राजीनामा देखील दिलाय आणि तो स्वीकारण्यात आलाय. पोलिसांनी तपास सुरू केलाय. मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्हात एक धक्कादायक घटना घडली आहे. 23 वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार करण्यात आला. हैराण करणारे म्हणजे आरोपी हा थेट भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष आहे. यामुळे मोठी खळबळ निर्माण झालीये. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल होताच, आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. याबद्दलची सविस्तर माहिती ही पोलिस निरीक्षक आशुतोष सिंह राजपूत यांनी दिली आहे.

आशुतोष सिंह राजपूत यांनी म्हटले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) नुसार विदिशा जिल्हा भाजप उपाध्यक्ष योगेंद्र सिंग सोलंकी याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच 506 अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे 5 डिसेंबर रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आलंय. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने रविवारी रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्याला याप्रकरणी फसवले जात असल्याचा देखील आरोप योगेंद्र सिंग सोलंकी याने केलाय. आरोपीने आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, जोपर्यंत तो बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्त होत नाही तोपर्यंत पक्षाच्या बाहेर राहायचे आहे. विदिशा भाजपचे जिल्हाध्यक्ष राकेश सिंह जदौन यांनी देखील याप्रकरणी मोठे भाष्य केले आहे. राकेश सिंह जदौन हे म्हणाले की, योगेंद्र सिंग सोलंकी हा पक्षाचा सदस्य नाहीये. त्याचा राजीनामा सोमवारी मिळाला आणि तो स्वीकारण्यात देखील आलाय. पोलिस अधीक्षक रोहित केशवानी यांनी सांगितले की, पीडितेचे अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण होत होते. आरोपी हा पीडितेच्या घरी पोहोचला होता. पोलिसांनी पीडितेचा वैद्यकीय अहवाल प्रयोगशाळेत पाठवला आहे. तो अहवाल आल्यानंतर वेगाने कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आलंय. पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपी हा एकदा तिच्या घरी आला होता. त्यावेळी तिचे घरचे बाहेर गेले होते, त्याने बळजबरी करत बलात्कार केला. त्यानंतर तिला धमकावण्यात आले. संधी मिळेल, तसे तो पीडितेच्या घरी येत आणि बलात्कार करत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.