मित्राला पोलिसांत नोकरी, पार्टी करुन येताना सहा मित्रांच्या गाडीला अपघात, चौघांची साथ सुटली

बीडमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात चार मित्रांचा एकत्र अंत झाला आहे. तर दोन मित्र जखमी असल्याची माहिती आहे.  शहरापासून जवळ असलेल्या वाघाळा पाटीजवळ आज मंगळवारी (१० डिसेंबर) कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारमधील सर्व प्रवाशी कारेपूर (ता. रेणापूर) येथील राहणारे असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मित्राची पुणे येथे पोलीसमध्ये निवड झाल्यामुळे हे मित्र आनंद साजरा करण्यासाठी जेवायला गेले होते. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील कारेपूर या गावात राहणारे हे मित्र सोमवारी ९ डिसेंबरला रात्रीच्या सुमारास जेवणासाठी मांजरसुंबा (जिल्हा बीड) जवळ गेले होते. तेथे जेवण करून ते पहाटे मांजरसुंबा येथील ब्रिज खाली शेकोटी करून थांबले. त्यानंतर पहाटे चार वाजता स्विफ्ट कार क्रमांक एम एच १४, एल एल ६७४९ ने मांजरसुंबा येथून निघून पुढे अंबासाखर कारखाना मार्गे रेणापूरकडे महामार्गाने जात होते.
तेवढ्यात अंबासाखर कारखान्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला समोरासमोर स्विफ्ट कारची धडक झाली. या अपघातात कारचा चुराडा होत स्विफ्ट कारमधील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात बालाजी शंकर माने (वय २७), फारुख बाबुमिंया शेख (वय ३०), दीपक दिलीप सावरे (वय २८), ऋतवीक गायकवाड (रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू) अशी मृतांची नावं आहेत. तर जखमींमध्ये मुबारक शेख, अजिम पाशुभाई शेख (३० वय) (पोलीस निवड) स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामा पडवळ पोलीस कर्मचारी नाना राऊत व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या महामार्गावर आजपर्यंत अनेक अपघात झाले असून या महामार्ग चौपदरी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.