सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे ३ डिसेंबर रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास अपहरण केल्याची तक्रार आल्यावर, अज्ञातांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला पुण्यात नेले. आणि तिथे मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेविरोधात पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवत सहा डिसेंबर रोजी दोन्ही आरोपींना अटक करत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही थांबता थांबेनात. निवडणूक काळात आळा बसलेल्या अत्याचाराच्या घटना, आचारसंहिता संपल्यानंतर आता समोर यायला लागल्या आहेत. मुर्तीजापुर तालुक्यामध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये अल्पवयीन मुलीसोबत घडलेली अत्याचाराची ही दुसरी घटना आहे. मुर्तीजापुर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे ३ डिसेंबर रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास अपहरण केल्याची तक्रार आल्यावर, अज्ञातांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आरोपीने मुलीचे अपहरण करून तिला पुण्यात नेले. आणि तिथे मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेविरोधात पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवत सहा डिसेंबर रोजी दोन्ही आरोपींना अटक करत गुन्हा दाखल केला आहे.










