चंद्रपुरात एका तरुणाने नदीत उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली. या तरुणाने सर्वांसमोरच नदीत उडी घेतली. हे पाहून साऱ्यांना धक्का बसला आहे. चंद्रपुरात एका तरुणाने नदीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक माहिती आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणाने सर्वांसमोरच नदीत उडी घेतली, यामुळे प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर काटा उभा राहिला. कोणाला काही कळायच्या आतच या तरुणाने नदीत उडी घेतल्याने कोणाला काहीही करता आलं नाही. सध्या या तरुणाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.चंद्रपुरात नदी पुलावर अनेकजण उभे होते. तेवढ्यात एक तरुण दुचाकीने त्या पुलावर आला. त्याने दुचाकी पुलावर उभी केली आणि कोणाला कळायच्या आत थेट नदीपात्रात उडी घेतली. पुलावर असलेले लोक त्याला बघून अरे.. अरे.. करीत राहिले आणि तो काही क्षणात खोल पाण्यात बुडू लागला.










