प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; डोक्यात दगड घालून हत्या.

अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरुण पत्नी पूजासह वास्तव्याला होता. गुरुवारी ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार त्यांच्या ओळखीचा असलेला सागर चौधरी याच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेले होते. पत्नीच्या अनैतिक संबंधात पती अडचण ठरत असल्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात घडली आहे. याबाबत मारेकरी पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात तुषार सिंधू चौधरी (वय ३७, रा. मारवड ता. अमळनेर, हल्ली मुक्काम प्रतापमिल अमळनेर) या व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फरार झालेल्या संशयित आरोपी प्रियकरासह मृताच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याबाबत सागर चौधरी (वय ३५, रा. दोंडाईचा जि. धुळे) आणि मृताची पत्नी पुजा तुषार चौधरी असं दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली. अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरुण पत्नी पूजासह वास्तव्याला होता. गुरुवारी ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून तुषार त्यांच्या ओळखीचा असलेला सागर चौधरी याच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे गेले होते. त्यावेळी दोघांनी सोबत दारू पिली दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला. यामध्ये दारूच्या नशेत सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून करून प्रसार झाला होता.

तर दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत तुषार हे घरी पोहोचलेले नव्हते. दरम्यान, शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता तुषार यांचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी परिसरात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. तुषार चौधरी यांच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला त्याच्या गावातून शिंदखेडा येथून अटक केली. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधातून केल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे पोलिसांनी मयत तुषार चौधरी यांची पत्नी पुजा चौधरी हिला देखील ताब्यात घेतलं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.