लग्न केलं तर तिच्याशीच, पण आईचा नकार, प्रेमात आंधळ्या मुलाने जन्मदात्या आईला…. धक्कादायक प्रकार समोर

 एका 22 वर्षीय मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हेच नाही तर आईच्या हत्येनंतर त्याने चोरी झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आईचा प्रेयसीसोबतच्या लग्नाला विरोध असल्याने मुलानेच आईची हत्या केली

 एका मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुढे आलीये. हेच नाही तर मुलाने पोलिसांना फोन करून या हत्येची माहिती दिली. मात्र, त्याने चोरीचा बनाव केला. ही घटना पश्चिम दिल्लीतील आहे. ख्याला भागात एका 45 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना फोनवर देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हत्या झालेल्या महिलेचे नाव सुलोचना (वय45) आहे. 6 डिसेंबरच्या रात्री ही हत्या घडली. 6 डिसेंबरच्या रात्री पोलिसांना एक फोन आला. 
सावन नावाच्या तरुणाने पीसीआरला फोन करून आपल्या आईची हत्या झाली असून सोन्याचे कानातले देखील गायब असल्याचे म्हटले. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांना दिसले की, घरातील महागड्या वस्तू तिथेच आहेत फक्त सुलोचना यांच्या कानातले गायब आहेत. पोलिसांनी यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करत याप्रकरणी तपास सुरू केला. मात्र, या हत्येमध्ये चोरीचा अॅंगल सापडत नव्हता.मयत सुलोचना या रघुवीर नगरमध्ये 27 वर्षीय कपिल आणि 22 वर्षीय सावन या दोन मुलांसोबत राहत होत्या. त्यांच्या पतीचे निधन 2019 मध्येच झाले होते. सुलोचना यांचा मोठा मुलगा कपिल हा एका खाजगी कंपनीत अकाउंटंट आहे. पोलिसांनी याप्रकरणी शेजाऱ्यांची विचारपूस केली. सीसीटीव्ही चेक केले. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. घरात कोणी चोर घुसला याचेही काहीच पुरावे पोलिसांना मिळत नव्हते. पोलिसांना सुलोचना यांचा मुलगा सावन याच्यावर संशय आला. तो आपले म्हणणे सतत बदलताना दिसला. पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. सावनने पोलिस चाैकशीत सांगितले की, त्याच्या मोठ्या भावाचे लग्न ठरले आहे. त्यानंतर त्याने आपल्या आईला सांगितले की, त्याला एक मुलगी पसंत असून तिच्यासोबत लग्न करायचे आहे. त्यानंतर सुलोचनाने यावर परत बोलायचे नाही असे स्पष्ट सांगत परत जर त्या मुलीसोबत लग्न करायचे म्हटला तर संपत्तीमधून बेदखल करेल असे म्हटले. हाच राग सावनच्या मनात बसला आणि त्याने आईची हत्या केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.