शिळा केक खाल्ल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील चिमुकल्या दोन भावंडांचा मृत्यू.

 कोल्हापुरात दोन चिमुकल्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घ डली आहे. या दोघांनी फ्रिजमध्ये ठेवलेला केक खाल्ला होता.कोल्हापूर जिल्ह्यातील चिमगाव इथल्या सख्या बहीण भावांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. श्रीयांश रणजीत आंगज (वय वर्ष ५) आणि काव्य रणजीत आंगज (वय वर्ष ८) अशी दोघांची नावे आहेत. फ्रिजमध्ये ठेवलेला केक खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या दोघांनी फ्रिजमध्ये ठेवलेला केक खाल्ला होता. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती. या घटनेमुळे चिमगाव परिसरात शोकाकुल वातावरण पसरलेला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगाव या गावी रणजीत आंगज त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसमवेत राहत होते. दोन दिवसांपूर्वी ५ वर्षीय श्रेयांश आणि त्यांची ८ वर्षीय मुलगी काव्य या दोघांनी फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा केक खाल्ल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. शिळा केक खाल्ल्याने श्रीयांश आणि काव्य या दोघांना उलटी आणि मळमळ असा त्रास जाणू लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेत असतानाच मुलगा श्रेयांश याला जास्त त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला तातडीने मुरगुड इथल्या एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, या पूर्वीच श्रेयांशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. हे कळताच आई वडिलांनी एकच आक्रोश केला. या घटनेने आंगज कुटुंबीय हादरून गेले होते. शोकाकुल वातावरणात चिमगावमध्ये श्रेयांशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तोपर्यंत मुलगी काव्य हिला देखील त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे सायंकाळी तिला मुरगुड इथल्या खाजगी दवाखान्यात दाखल केलं. पण, ती उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने तातडीने तिला कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात आणण्यात आलं. काव्यची प्रकृती अधिकच खालावली आणि सायंकाळी काव्यचीही प्राणज्योत मालावली. एकाच कुटुंबातील दोन भावंडांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरलं आहे. या घटनेची माहिती कळताच मुरगुड पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.