गुलाबराव पाटील भावी उपमुख्यमंत्री ?

गुलाबराव पाटील भावी उपमुख्यमंत्री ?

जळगाव : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा जवळपास सुटलेला असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री होणे त्यांच्यासाठी योग्य नसल्याचे म्हटले जाते. पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात माजी गुलाबराव पाटील यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून फलक झळकले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळत नसल्यास किमान उपमुख्यमंत्री व्हावे अशी पक्षातील काही आमदारांची मागणी आहे. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे असे सर्वांचे मत आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नसतील तर दीपक केसरकर, दादा भुसे, भरत गोगावले, शंभुराज देसाई, उदय सामंत या नेत्यांची नावे पर्याय म्हणून पुढे आली आहेत.

गुलाबराव पाटील यांच्याही नावाची चर्चा आता उपमुख्यमंत्रीपदासाठी सुरु झाली आहे. शिंदे गटाकडून त्यास अद्याप दुजोरा मिळालेला नाही किंवा वैयक्तिक गुलाबराव पाटील यांनी त्यासंदर्भात कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, जळगाव ग्रामीण मतदारसंघात विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी लावण्यात कार्यकर्त्यांकडून आलेल्या फलकांवर त्यांचा भावी उपमुख्यमंत्री म्हणून स्पष्ट उल्लेख केल्याचे दिसून आले आहे. गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री होते, याशिवाय त्यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद होते.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा जळगाव ग्रामीणमध्ये पराभव केला आहे. राज्याच्या नवीन मंत्रिमंडळातही त्यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.