पंधरा हजारांची लाच घेताना दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात

पंधरा हजारांची लाच घेताना दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात

जळगाव | पारोळा धरणगाव रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये वाहन चालकाला अटक न करण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. ती पंधरा हजार रुपयांची लाच घेताना एका पोलीस कर्मचाऱ्याला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.तर दुसरा पोलीस मात्र फरार झाला आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, पारोळा ते धरणगाव रस्त्यावर काही दिवसांपूर्वी दुचाकीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दुचाकी वाहनचालकाला अटक न करण्यासाठी पारोळा पोलीसांत असलेले हिरालाल देविदास पाटील आणि प्रवीण विश्वास पाटील यांनी त्या वाहन चालकाला तीस हजार रूपयांची लाच मागितली होती. यामध्ये तडजोड होऊन पंधरा हजार रूपयांची लाच देण्याचे निश्चीत झाले. या प्रकरणी वाहन चालकाने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळ्याच्या पथकाने पंधरा हजार रूपयांची लाच स्वीकरतांना एका पोलीसाला रंगेहात अटक केली तर दुसरा मात्र फरार झाला आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात हिरालाल देविदास पाटील ( वय- 43 वर्ष पारोळा पो.स्टे.रा प्लॉट. नं.66, हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर); प्रवीण विश्वास पाटील, (वय.45 वर्ष, रा. पोलीस लाईन, बसस्थानकाजवळ, पारोळा ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे धुळे येथील निरिक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, रामदास बारेला आणि प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.