घरातून रोकड चोरणाऱ्याला मोलकरणीला रंगेहात पकडले

घरातून रोकड चोरणाऱ्याला मोलकरणीला रंगेहात पकडले

जळगाव शहरातील शिवाजी नगरात राहत्या घरात कोणी नसल्याची संधी साधत २६ हजार रुपये चोरणाऱ्या मोलकरणीला घरमालक महिलेने रंगेहाथ पकडले. ही घटना शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली.याप्रकरणी सकाळी ११ वाजता मोलकरणीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनी हनुमान पवार (वय-२४, रा. शिवशक्ती नगर, जळगाव ) असे मोलकरणीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरात ॲड. अंजली भुसारी यांचे निवासस्थान असून शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता रोजी त्यांचे पती ॲड. केदार भुसारी हे मालेगाव येथे गेले होते. त्यावेळी ॲड. अंजली व त्यांच्याकडे काम करणारी सोनी पवार या घरी होत्या. काही कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या ॲड. अंजली घरात परत आल्या तर मोलकरणीने कपाटातून २६ हजार रुपये काढून व कपाट पुन्हा लावत असल्याचे दिसले. तिला रंगेहाथ पकडून शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी पोलिस तेथे पोहचले व मोलकरणीला ताब्यात घेतले. याप्रकरणी ॲड. अंजली भुसारी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोनी पवार हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ सतीश पाटील करीत आहेत.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.