गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

भुसावल (जळगाव) : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षकासह त्याच्या पंटरला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली.भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक किरण सोनवणे (वय ३९) यांनी पथकासह मंगळवारी (ता. १९) तक्रारदाराच्या घरी अवैध दारू विक्रीबाबत छापा टाकला होता. या छाप्यात तक्रारदाराकडे असलेल्या ३० ते ३५ हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. या वेळी तक्रारदाराकडून १० हजार रुपये घेतले होते,

तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.त्याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता, कारवाईदरम्यान दोन्ही संशयितांनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदारांना त्रास न देण्यासाठी प्रथम ५० हजारांची मागणी करून तडजोडीअंती ३० हजार रुपयांची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. शुक्रवारी संशयित किरण माधव सूर्यवंशी (वय ३७, रा. हुडको कॉलनी, भुसावळ) व खासगी इसमास ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पकडले. त्यांच्यावर फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.