जळगाव जिल्ह्यात ‘मविआ’चा सुपडा साफ

जळगाव जिल्ह्यात ‘मविआ’चा सुपडा साफ

जळगाव जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे महायुतीने सर्व अकरा जागा जिंकत आपले वर्चस्व राखले आहे. महाविकास आघाडीला जिल्ह्यात खातेही उघडता आले नाही. कॉंग्रेसकडे असलेली रावेरची जागाही हातून गेली आहे.विशेष म्हणजे सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा या ठिकाणी पुन्हा विद्यमानांनी मतदारांनी संधी दिली आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वच युतीचा झेंडा फडकला आहे. मतमोजणीला सकाळी साडेआठ वाजेता प्रारंभ झाल्यानंतर सुरूवातीपासूनच युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतले होती. ती शेवटपर्यंत कायम दिसून आली. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण व शिवसेना (उबाठा) गटाचे उन्मेश पाटील यांच्यात लढत झाली. यात मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यात सर्वाधिक लीड घेत विजय नोंदविला. जळगाव ग्रामीणमध्ये आजी- माजी पालकमंत्र्यांमध्ये मुख्य लढत झाली. यात शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला.राज्याचे लक्ष लागलेल्या जामनेर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांनी आपला बालेकिल्ला अबाधित ठेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रा. दिलीप खोडपे यांचा परावभ केला. मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) रोहिणी खडसे यांचा पराभूत केला. तर पाचोरा येथील लक्षवेधी लढतीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर आप्पा पाटील यांनी अपक्ष उमेदवार अमोल शिंदे व उबाठा वैशाली पाटील यांचा पराभव केला.

चोपड्यात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत सोनवणे व उबाठा गटाचे प्रभाकर सोनवणे यांच्यात सरळ लढत होऊन चंद्रकांत सोनवणे यांनी विजयश्री खेचून आणला. रावेरमध्ये भाजपचे अमोल जावळे यांनी काँग्रेसचे धनंजय चौधरी यांना आस्मान दाखवित कॉंग्रेसकडे असलेली एकमेव जागा खेचून आणली. भुसावळमध्ये पुन्हा भाजपचे संजय सावकारे यांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे डॉ. राजेश मानवतकर यांचा पराभव केला जळगाव शहर मतदारसंघात भाजपाचे सुरेश भोळे यांनी विजय नोंदवित उबाठचे जयश्री महाजन यांचा पराभव केला.अमळनेरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील यांनी अपक्ष व माजी आमदार शिरीष चौधरी व काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे यांना पराभूत केले. एरंडोलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांनी माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.