जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात आ. राजूमामा भोळे ४८ हजार मतांनी आघाडीवर.
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांना सातव्या फेरी अखेर ७८ हजार ५२६ मते मिळून जोरदार आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या नंबरवर महाविकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन यांनी २९ हजार ६५० मते घेतली आहेत. त्यामुळे सध्या ४८ हजार मतांच्या आघाडीवर आ. भोळे हे पुढे आहेत.
इतर उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार अश्विन सोनवणे ४५१८, वंचित बहुजन आघाडीचे ललितकुमार घोगले २३११, यावल येथील जयश्री सुनील महाजन यांना १०१८, कुलभूषण पाटील २४२१, मनसेचे डॉ. अनुज पाटील यांना ६९७, बहुजन समाज पार्टीचे शैलजा सुरवाडे यांना ४६६ मते मिळाले आहेत.