अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अक्षयला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. अक्षय उत्कृष्ट अभिनेता आहेच शिवाय तो कायम देशाप्रती त्याचं कर्तव्य बजावताना दिसतो. अक्षयने भारताचं नागरिकत्व मिळाल्यावर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी त्याचं व्होट दिलंय. अक्षयने सकाळी लवकर जाऊन गर्दी व्हायच्या आधी त्याचं मतदानाचं कर्तव्य बजावलं आहे. अक्षयचा मतदान केंद्राबाहेरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. अक्षयने बजावला मतदानाचा हक्क अक्षयने त्याच्या स्टाफसह गाडीमधून उतरुन मतदान केंद्रावर हजेरी लावली. अक्षयच्या आधी मतदान केंद्रावर काही लोक उपस्थित होते. कोणतीही घाईगडबड न करता अक्षयने शांतपणे मतदान केलं. अक्षयला पाहण्यासाठी सर्वसामान्य माणसांची गर्दी जमली होती. अक्षयने सर्वांची दखल घेतली. कोणालाही नाराज केलं नाही. पुढे मतदान केंद्राबाहेर उपस्थित मीडियासमोर अक्षयने त्याच्या भावना व्यक्त केल्या. भारतीय नागरिकत्व मिळाल्यावर पहिल्यांदाच अक्षयने विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं.

अक्षयला मीडियाने मतदानाविषयी प्रश्न विचारला. तेव्हा अक्षयने त्याच्या भावना व्यक्त केल्या. अक्षय म्हणाला की, “खूप चांगली सोय केली आहे. सफाई सुद्धा चांगली ठेवलीय. याशिवाय ज्येष्ठ नागरीकांची सुद्धा चांगली काळजी ठेवण्यात आलीय.” आणि मग शेवटी अक्षयने सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. अशाप्रकारे अक्षयने भारतीय नागरिकत्व मिळाल्यावर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी त्याचा मतदानाचा हक्क बजावला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.