शिवसेनेच्या उमेदवारावर गोळीबार, 5 जणांनी झाडल्या गोळ्या, अहिल्यानगरमध्ये खळबळ

शिवसेनेच्या उमेदवारावर गोळीबार, 5 जणांनी झाडल्या गोळ्या, अहिल्यानगरमध्ये खळबळ

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानाच्या काही तास आधी महाराष्ट्रात काही ठिकाणी उमेदवारांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात अहिल्यानगरमध्ये श्रीरामपूर इथं उमेदवाराच्या गाडीवर गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या पाच हल्लेखोरांनी त्यांनी गोळ्या झाडल्या.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेऊन परतत येत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर हा प्रकार घडला. गोळी मिसफायर झाल्यानं भाऊसाहेब कांबळे हे थोडक्यात बचावले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराच्या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भाऊसाहेब कांबळे यांच्यावर अशोक सहकारी साखर कारखान्यासमोर तिघांनी गोळीबार केला. गोळी मिसफायर झाल्यानं ते थोडक्यात बचावले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.