मतदानाला काही तास बाकी असताना शरद पवारांनी डाव फिरवला?

मतदानाला काही तास बाकी असताना शरद पवारांनी डाव फिरवला?

विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहीले आहेत, आज प्रचाराच्या तोफा थंडावतील. येत्या वीस नोव्हेंबरला बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे. तर तेवीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. 2019 नंतर राज्यात दोन बड्या पक्षात फूट पडली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षाचे दोन गट झाले. त्यापैकी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं भाजपला पाठिंबा दिला आणि सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीपूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले. दरम्यान या फुटीनंतर राज्यात प्रथमच विधानसभेची निवडणूक होत असल्यानं या निवडणुकीकडे राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान यावेळी सर्वच राजकीय पक्षांसमोर दुसरं मोठं आव्हान होतं ते म्हणजे त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील नाराज नेत्याची समजूत घालून बंडखोरी टाळण्याचं. मात्र अनेक ठिकणी बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या अधिकृत उमेदवारांचं टेन्शन वाढलं आहे. त्यातच मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोहोळमधील बंडखोरी मोडून काढण्यात यश आलं आहे. मोहोळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना बंडखोर उमेदवार संजय क्षीरसागर यांनी पाठिंबा दिला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी संजय क्षीरसागर यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. संजय क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आता त्यांनी राजू खरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकत वाढली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.