वंचितच्या उमेदवारावर अज्ञातांकडून हल्ला; गाडीवर केली दगडफेक : उमेदवार जखमी

वंचितच्या उमेदवारावर अज्ञातांकडून हल्ला; गाडीवर केली दगडफेक : उमेदवार जखमी

हिंगोली : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या असल्या तरी राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. गादीवर देखील दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीचे उद्या म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीसाठी मागील दहा-पंधरा दिवसांपासून सुरु असलेला प्रचार आता संपला आहे. उमेदवार आता गाठीभेटींवर भर देत आहेत. दरम्यान सोमवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी प्रचार थांबला अंडी नंतर रात्री उशिरापर्यंत काही उमेदवार हे घरी जात होते. याच दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर हल्ला झाल्याची घटना हिंगोलीमध्ये घडली आहे.

उमेदवार जखमी..

हिंगोली कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावरील सेल्सुरा फाटा येथे ही घटना घडली आहे. या हल्ल्यात उमेदवार दिलीप मस्के हे जखमी झाले आहेत. दरम्यान मस्के यांना तातडीने हिंगोलीच्या खाजगी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठवण्यात आले आहे. या घटनेचा वंचित बहुजन आघाडीने निषेध केला आहे. हल्ला करणाऱ्या आरोपी विरोधात तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.