धामोडी येथिल वारकऱ्यांची महायुतीचे उमेदवार विजयी होण्यासाठी ओंकारेश्वर पायी दिंडी
रावेर प्रतिनिधि:- प्रदीप महाराज रावेर तालुक्यातील धामोडी येथील वारकरी संप्रदायाच्या वतीने मुक्ताईनगर विधानसभा उमेदवार चंद्रकांत भाऊ पाटील आणि रावेर विधानसभा उमेदवार अमोल भाऊ जावळे यांच्या विजयासाठी धामोडी ते ओंकारेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व दोघांच्या विजयासाठी महादेवाला साकडे घालण्यात आले. धामोडी गावातून टाळ मृदुनगाच्या गजरात पायी दिंडी काढण्यात आली होती त्यात वारकरी पुरुष व महिला सहभागी झाले. दिंडी रावेर येथे पोहोचताच भाजप कार्यालय येथे तालुकाध्यक्ष भाजप महेश चौधरी, भाजप तालुका सरचिटणीस दुर्गादास पाटील यांच्या वतीने मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पुढे दिंडी ओंकारेश्वर येथे निघाली. महायुती विजयी व्हावी यासाठी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रावेर विधानसभा उमेदवार अमोल भाऊ जावळे तसेच मुक्ताईनगर विधानसभा उमेदवार चंद्रकांत भाऊ पाटील हे पुन्हा निवडून यावे यासाठी वारकरी संप्रदायाच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

जय सीताराम भजनी मंडल, नितिन सपकाले, मोतीलाल महाराज,फकीरा पाटिल,हीरामण महाजन, सिताराम महाजन, शंकर पाटील, ब्रम्हा,विष्णू,महेश,पिंटू कोळी,गणेश महाजन, पंकज पाटील,शुभम पाटील भुरा पाटील, मयूर पाटील, पिंटू,मेढे हे वारकरी उपस्थित होते.









