शरद पवारासह उद्धव ठाकरेंच्या जळगाव जिल्ह्यात होणार सभा; कुठे आणि कधी?

शरद पवारासह उद्धव ठाकरेंच्या जळगाव जिल्ह्यात होणार सभा; कुठे आणि कधी?

१० नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून राज्यातील प्रमुख नेत्यांचे दौरे निश्चित झाले आहेत. महाविकास आघाडीचे तीन नेते पुढच्या आठवड्यात जिल्ह्यात सहा सभा घेणार आहेत. त्यात सोमवारी खासदार शरद पवार यांच्या चार तर उद्धव ठाकरेंच्या दोन सभा होतील. खासदार संजय राऊत हे दोन दिवस मुक्कामी थांबणार आहेत. सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चाळीसगाव येथे दुपारी १२ वाजता तर चोपडा येथे सायंकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यासाठी ठाकरे विमानाने जळगावला येतील. तेथून हेलिकॉप्टरने चाळीसगावला जातील. खासदार शरद पवार हे सोमवारी सकाळी जालना येथून पारोळा येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभेला हजेरी लावतील.

त्यानंतर दुपारी २ वाजता शिंदखेडा येथून निघून जामनेरला चार वाजता सभा घेतील. ५ ते ६.३० वाजेदरम्यान मुक्ताईनगरला व त्यानंतर धरणगाव येथे ७.३० ते ९ वाजेदरम्यान जाहीर सभा होणार आहे. शरद पवार हे सोमवारी जळगावात मुक्कामी थांबणार आहेत. खासदार संजय राऊत हे देखील १३ व १४ नोव्हेंबर असे दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यात ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांचे प्रत्येक मतदारसंघात सभांचे नियोजन सुरू झाले असल्याचे संबंधित पक्षांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.