गांजा या अंमली पदार्थाची अवैधपणे तस्करी करणारा इसमास ताब्यात.

रावेर पोलीसांनी पाल शेरीनाका येथे नाकाबंदी दरम्यान मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या गांजा या अंमली पदार्थाची अवैधपणे तस्करी करणारा इसमास ताब्यात घेवून त्याच्या कडून एकुण १,७४,५८०/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगर करण्यात आला आहे.

दिनांक 08/11/2024 रोजी पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोशि/878 सचिन रघुनाथ घुगे, पोशि/2059 महेश मंगलदास मोगरे, पोशि/2752 विशाल शिवाजी पाटील, पोशि/1244 अतुल गाडी लोहार असे हजर असतांना मा. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल साहेब यांनी आम्हाला त्यांचे दालनात बोलवून कळविले की, आत्ताच मला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम ज्याने आकाशी रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट असा पेहराव केलेला इसम मोटार सायकलवरुन मध्यप्रदेश राज्यातुन पालगावाकडे गांजा विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली आहे.मिळालेल्या गोपणीय माहिती नुसार पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोशि/ 2059 महेश मंगलदास मोगरे, पोशि/ 878 सचिन रघुनाथ धुगे, पोशि/2752 विशाल पाटील, पोशि/1244 अतुल दिलीप गाडी लोहार, कृषी अधिकारी भाऊसाहेब चंद्रकांत वाळके, वर नमुद दोन शासकीय पंच, पाल दुरक्षेत्र अंतर्गत पाल ते खरगोन रस्त्यावरील शेरीनाका येथे रवाना होवुन विधानसभा निवडणुक-2024 च्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदीच्या पुढे अंदाजे 50 मी. अंतरावर थांबलो असता खरगोन (म.प्र.) च्या दिशेने सदर इसम हा आला त्यावेळी पोलीसांनी त्यास शिफातीने पकडुन त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव फिरोज मुबारक तडवी, वय 47 वर्षे, व्यव. मजुरी, रा. पाल ता. रावेर असे सांगितले. सदर इसमाच्या ताब्यातील होंडा कंपनीची काळ्या रंगाची ज्यावर लाल रंगाचा पट्टा असलेली शाईन मोटर सायकल क्रमांक एम. एच. 19 बीके 7980 हिचेवर एक विमल पानमसाला लिहिलेल्या कापडी पिशवीत 5 किलो 229 ग्रॅम वजनाचा प्रतिबंधीत असलेला मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा गांजा सदृश्य अंमली पदार्थाची स्वतःच च्या आर्थीक फायद्यासाठी बेकायदेशीर रित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करताना मिळून आल्याने त्याचे विरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्ये आणी मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii (ब) प्रमाणे रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि तुषार सुधाकर पाटील हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी , अशोख नखाते अपर पोलीस अधिक्षक जळगांव, अन्नपूर्णा सिंह सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग कृष्णांत पिंगळे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि तुषार पाटील, पोहेकों ईश्वर चव्हाण, पोकों/सचिन घुगे, पोकों/प्रमोद पाटील, पोकों/विशाल पाटील, पोकों/महेश मोगरे, पोकों/अतुल गाडीलोहार यांच्या पथकाने कार्यवाही केली.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.