रावेर पोलीस स्टेशन यांनी चोरवड नाका येथे २२,०११६०/- रु किंमतीचा विलम गुटखा व वाहन मुद्देमालासह जप्त करण्यात आले. अवैद्य गुटखा वाहतुकिवर लक्ष ठेवून कार्यवाही करणे संदर्भात मा. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सो, मा. अशोक नखाते सो, अपर पोलीस अधिक्षक जळगांव, श्रीमती अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, यांनी आदेशीत केले होते.
दिनांक ०७/११/२०२४ रोजी मा. पोलीस निरीक्षक सो, विशाल जयस्वाल यांनी त्यांना कळवीले की, बऱ्हाणपुर वरुन एक महिंद्रा बोलोरो कंपनीची चार चाकी गाडी क्र.MH०४HY६५१५ या मध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधीत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेवुन बऱ्हाणपुर कडुन रावेर कडे घेवुन येत आहे. तरी सदर गाडी ताब्यात घेवुन त्यावर योग्य ती कायदेशिर कारवाईकरा, असे दिलेल्या सुचनां वरुन रात्रगस्त कर्तव्या वरील सपोनि अंकुश जाधव, पोकों/२७५२विशाल पाटील, पोकाँ/४०३रविंद्र भांबरे, असे विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने लावण्यात आलेल्या चोरवड येथील नाकाबंदी ठिकाणी जावुन थांबलो.
चोरवड नाका येथील नाकाबंदी येथे ०१.५० वाजेचे सुमारास एक महिंद्रा बोलोरो कंपनीची चारचाकी गाडी क्र.MH०४HY६५१५ हि येतांना दिसली आम्ही त्यागाडीला थाबंवुन त्यावरील चालकास व त्याचेसोबत असलेल्या इसमास त्यांचे नाव गाव विचारले असता चालक याने त्याचे नाव रिजवान शेख रऊफ वय. २८ वर्ष व त्याचे सोबत असलेल्या इसमाने त्याचे नाव शेख शोयब शेख शरीफ वय. २७ वर्ष दोन्ही रा. छत्री चौक पठाण वाडी, फैजपुर ता. यावल जि. जळगाव असे सांगीतले. महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबधीत असलेला विमल गुटखाचा साठा आढळुन आला. सदरबाबत त्यांना विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, मी सदरचा माल तसेच सदर वाहन चालक रिजवान शेख रऊफ यास वरील सुगंधीत केसयुक्त विमल पान मसाला व तंबाकुजन्य पदार्थ हे कोठुन आणले याबाबत विचारले असता अरुण (पूर्ण नाव माहीत नाही) रा. बऱ्हाणपुर म.प्र. याचे कडुन त्याचे बादलपुररोड, ब-हाणपुर येथील एका गोडाऊन मधुन आम्हाला माल दिलेला आहे असे सांगीतले. त्याचे जवळ मिळुन आलेल्या साठ्याचे वर्णन व किंमत खालीलप्रमाणे. २२,०१,१६०/- रु किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असुन (१) रिजवान शेख रऊफ वय. २८ वर्ष (२) शेख शोयब शेख शरीफ वय, २७ वर्ष दोन्ही रा. छत्री चौक पठाण वाडी, फैजपुर ता. यावल जि. जळगाव त्याचे कब्जात बाळगताना मिळुन आला. सदरचा साठा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी बंदी असल्याने सदरचा साठा पो. काँ २८३६ संभाजी रघुनाथ बिजागरे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे अन्नपदार्थ हे महाराष्ट्र राज्यात अन्नसुरक्षा आयुक्त यांची अधिसुचना क्रमाक असुमाअ/अधिसुचना ७९४/२०१८/७ दि.२०/०७/२०१८ नुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टीने प्रतिबंधीत करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अंकुश जाधव हे करीत आहे.
वरील कामगीरी मा.पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सो, मा. अशोक नखाते सो, अपर पोलीस अधिक्षक जळगांव, श्रीमती अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, पोनि डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सपोनि अंकुश जाधव, पोहेकॉ संजय मेढे, पोकाँ/ विशाल पाटील, पोकों/ रविंद्र भांबरे, पो.कॉ संभाजी बिजागर, पोकों/सचिन घुगे यांच्या पथकाने कार्यवाई केली आहे. (डॉ. विशाल जयस्वाल) पोलीस निरीक्षक रावेर पोलीस स्टेशन