स्वागतम मामा…सुस्वागतम मामा…गाणी गात महिलांनी केले स्वागत

स्वागतम मामा…सुस्वागतम मामा…गाणी गात महिलांनी केले स्वागत

शहरातील अयोध्या नगर, रामचंद्र नगर, अशोक नगर भागात भरभरून प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांनी शनिवारी दि. ९ रोजी सकाळी अयोध्या नगर परिसर, अशोक नगर, विद्यानगर, रामचंद्र नगर भागात नागरिकांशी संवाद साधून विजयासाठी शुभाशीर्वाद घेतले. एका वृद्ध महिलेने, “राजूभाऊ, आता माह्या घरी येशीन तर लाल दिव्याच्या गाडीतच येजो रे भौ…” म्हणत शुभाशीर्वाद दिले. या महिला भगिनीच्या प्रेमामुळे आ. राजूमामा भोळे भारावून गेले. आ. राजूमामा भोळे यांनी शनिवारी अयोध्या नगर येथील मनुमाता मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. तेथून हॅपी होम कॉलनी, सोपानदेव नगर, रामचंद्र नगर, महादेव मंदिर परिसर, अशोक नगर, गीताई नगर, साईबाबा मंदिर परिसर, सिद्धिविनायक विद्यालय परिसर मार्गे रामचंद्र नगरातील हनुमान नगरात प्रचाराचा समारोप केला. परिसरातील श्री विश्वकर्मा मंदिरात महिला भगिनींनी, स्वागतम मामा…सुस्वागतम मामा… गीताने स्वागत करून औक्षण केले. भगवान श्री विश्वकर्माचे आ. भोळे यांनी दर्शन घेतले.

यानंतर विशाल कोल्हे, सुनील सरोदे, प्रदीप रोटे, विजय वानखेडे, शालिक चौधरी आदींच्या घरी सदिच्छा भेट देऊन आशीर्वाद घेतले. खा. स्मिता वाघ यांनी प्रचारात उपस्थिती देऊन महिला भगिनी व नागरिकांना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी रिपाई व महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचे नागरिकांना आवाहन केले. रॅलीमध्ये खा. स्मिता वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष सुनील सरोदे, माजी उपमहापौर सुनील खडके, माजी नगरसेवक डॉ. वीरेन खडके, रंजना वानखेडे, विजय वानखेडे, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कैलास सोनवणे, दीप्तीताई चिरमाडे, संतोष इंगळे, किसन मराठे, बंटी भारंबे, ललित भोळे, सचिन भोळे, प्रकाश पाटील, आकाश भोळे, प्रकाश चौधरी, प्रदीप रोटे, पी. टी. दुसाने, वासुदेव भंगाळे, ॲडव्होकेट दीपकराज खडके, सोहन खडके, कुणाल खडके, निळकंठ खडके, मंजुळा मराठे, सीमा वाणी, मंगला खडसे, मनीषा रोटे, भावना लोखंडे, योगेश डोळे, योगेश निंबाळकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट दिलीप पोकळे, ज्योती चव्हाण, कुंदन काळे, हर्षल मावळे, शंतनु नारखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, अर्चना कदम, ममता तडवी, रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे, संजय सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.