ऑपरेशनच्या नावाखाली तोतया डॉक्टरने वृद्धेला फसवलं, लाखो रुपये उकळले.

 काही काळापासून मुंबईत फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. विशेषत: वृद्धांना हेरून, त्यांना टार्गेट करून त्यांची फसवणूक करत पैसे उकळण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अंधेरी येथेही घडली.

जेथे ऑपरेशनच्या नावाखाली एका भामट्या, तोतया डॉक्टरने वृद्ध महिलेची फसवणूक केली आणि तिच्याकडून 7 लाखांहून अधिक पैसे उकळले. धक्कादायक गोष्ट म्हणजे जवळपास तीन वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. मात्र पीडित महिलेने आत्ता याप्रकरणी तक्रार नोंदवल्याने तीन वर्षांनी हाँ गुन्हा उघडकीस आला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीत नोव्हेंबर 2021 मध्ये हा प्रकार घडला. ओळखपाळख नसलेल्या व्यक्तीकडून मिळालेल्या संपर्क क्रमांकावरून डॉक्टरशी संवाद साधत उपचार करून घेण्याचा प्रकार अंधेरीतील 61 वर्षीय महिलेच्या अंगलट आला. डॉ. झफर मर्चंट हा तोतया डॉक्टर आणि त्याचा सहकारी विनोद गोयल यांनी मिळून 2021 च्या नोव्हेंबरमध्ये या महिलेची आणि तिच्या कुटुंबाची फसवणूक केली होती.

पीडित महिला ही तिच्या आईला घेऊन 2021मध्ये डेन्टिस्टकडे गेली होती. त्यावेळी तेथे त्यांची ओळख विनोद गोयलसोबत झाली. त्यावेळी बोलताना आपल्या आईचे गुडघेही खूप दुखतात असं त्या महिलेने सांगितलं होतं. त्यावेळी आरोपी गोयलने त्यांना एका डॉक्टरचा कॉन्टॅक्ट नंबर देत त्याच्याशी बोलून उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या आईने दिलेल्या नंबरवर कॉल केला असता, समोरील इसमाने आपलं नाव डॉ. झफर मर्चंट असं सांगत ओळख करून दिली.

नंतर त्याने घरी जाऊन तक्रारदार महिलेच्या आईच्या गुडख्यावर साधं ऑपरेशन केलं. ते झाशस्वी झाली आहे असे सांगत त्या महिलेच्या आईच्या गुडघ्याचा त्रासही दूर झाल्याचे सांगितले. शिवाय, उपचारासाठी सात लाख २० हजार रुपये मागितले. तक्रारदार आणि तिच्या आईने सव्वा सात लाख रुपये रोख रक्कम म्हणून दिले. मात्र त्यानंतरही त्या महिलेच्या गुडघ्यातील वेदना काही थांबल्या नाहीत. म्हणून त्यांनी डॉ. मर्चंटला पुन्हा कॉल केला, पण त्यांचा नंबर बंद होता. ज्याच्याकडून नंबर मिळाला त्या विनोद गोयलशीही संपर्क साधला पण त्याने आधी खोटं आश्वासनं दिलं, नंतर फोन उचललाच नाही.

त्याचदरम्यान काही कारणामुळे तक्रारदार महिला तेव्हा पोलिसांत जाऊ शकली नाही. नंतर इतर काही लोकांचीही अशीच फसवणूक झाल्याचे तिच्या कानावर आलं. अखेर तीन वर्षानी तिने याप्रकरणाला वाचा फोडण्याचं ठरवलं आणि ओशिवरा पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. आरोपींनी अशा प्रकारे आणखी व्यक्तींची फसवणूक केली असल्याचा संशय आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

  • Related Posts

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे…

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न