सुप्रीम कॉलनीच्या तरुणांसह मनसेच्या शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

सुप्रीम कॉलनीच्या तरुणांसह मनसेच्या शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती, आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर ठेवला विश्वास

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील काही तरुणांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी रात्री प्रवेश केला. पक्षाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक धोरणांना पाठिंबा देऊन वार्ड क्रमांक १९ मधील सुप्रीम कॉलनी परिसरातील तरुण हर्षल आमोदे, सौरभ दांडगे, नरेश मराठे, मोहित मोरे, गौरव पाटील, पवन पाटील, संकेत लाड, विशाल सरोदे, आकाश मोरे, विवेक पवने, कृष्णा साबळे, यश मेश्राम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाचा गमछा त्यांच्या गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले. वेळी आ. राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदीप रोटे, सुनील सरोदे, विठ्ठल पाटील उपस्थित होते. प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष आशिष सपकाळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आगामी काळात आमदार राजूमामा भोळे यांना विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पक्षाच्या ध्येय धोरणांना जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही कार्यरत राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

  • Related Posts

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे…

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    हिवरखेड-तेल्हारा राज्यमार्गावर भीषण अपघात! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटी

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथे हिंदुराष्ट्र आव्हाणी नावाचे फलकाचे अनावरण करण्यात आले.

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द