पाचोऱ्यात किशोर पाटील vs वैशाली सूर्यवंशी दोन्ही बहीण-भावात लढत

पाचोऱ्यात किशोर पाटील vs वैशाली सूर्यवंशी दोन्ही बहीण-भावात लढत

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांना त्यांच्या बहिणीने आव्हान दिले आहे. यामुळे भाऊ-बहिणीची ही लढत लक्षणीय ठरणार आहे. विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून वैशाली सूर्यवंशी रिंगणात आहेत. पाचोरा मतदासंघासाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून आमदार किशोर पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. प्रतिस्पर्धी ठाकरे गटाने वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली. वैशाली या पाचोऱ्याचे माजी आमदार दिवंगत आर. ओ. पाटील यांच्या कन्या असून, किशोर पाटील हे त्यांचे चुलत बंधू आहेत.

मागील दोन निवडणुकांमध्ये आमदार किशोर पाटील यांना पाचोऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आव्हान मिळत होते. या निवडणुकीत खुद्द त्यांचीच बहीण त्यांना लढत देण्यासाठी सज्ज झाली आहे. आर. ओ. पाटील हयात असेपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक राहिले होते. त्यांनीच पुतणे किशोर पाटील यांना २०१४ मध्ये आमदारकीसाठी पहिल्यांदा पुढे केले होते. त्यामुळे किशोर पाटील यांना पाचोऱ्यातून आमदार होण्याचा बहुमान मिळाला. मात्र, काकांच्या पश्चात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आमदार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. दुसरीकडे आर. ओ. पाटील यांचा वारसा चालविणाऱ्या वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंना समर्थन दिले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.