शिरपूर तालुक्यातील अवैध मद्य व बनावट ताडी विक्री थांबवुन त्वरीत कारवाई करण्याची मागणी…

शिरपूर तालुक्यातील अवैध मद्य व बनावट ताडी विक्री थांबवुन त्वरीत कारवाई करण्याची मागणी…

मानव विकास पत्रकार संघ वृत्तपत्राचे संपादक, वार्ताहर, वृत्तपत्राचे इतर पदाधिकारी यांनी केली मागणी

शिरपुर प्रतिनिधी ; मानव विकास पत्रकार संघातर्फे नुकतेच मा. निरिक्षिक साो. राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय शिरपूर नगरपालिका शेजारी शॉपींग, वरचा मजला, शिरपूर ता. शिरपूर जि. धुळे. यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की, शिरपूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बनावट दारु विक्रीचे प्रमाण वाढलेले असुन तालुक्यात व शहरात बनावट व बेकायदेशीर दारु विक्रीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन, शासनाचा महसुल देखील मोठ्या प्रमाणात बुडत आहे.

तरी तालुक्यातील बनावट दारु व ताडी विक्रेत्यांवर त्वरीत कारवाई करण्यात येऊन नागरिकांचे होणारे शोषन व पिडवणुक व शासनाची फसवणुक थांबवण्यात यावी, शिरपूर तालुका हा मुंबई आग्रा महामार्गावर व मध्य प्रदेशाच्या सिमेलगत असल्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मद्याची अवैद्य वाहतुक वाहनांद्वारे होत असते. सदरील वाहनांची तपासणी करण्याची कड़क उपाययोजना करण्यात येऊन अवैद्य विक्रेत्यांवर व ढाबा मालक व होटेल मालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच विनापरवाना मद्य विक्री करणारे अवैद्य ढाबा / हॉटेल यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. कारण बनावट मद्य तसेच गावठी हातबट्टी दारुच्या सेवनामुळे जिवीतहानी व गंभीर स्वरुपाचे आजार होण्याची किवा अन्य दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते, तसेच शिरपूर तालुक्यातील किरकोळ व ठोक महा परवाना धारक यांच्या अनुज्ञेप्प जर बनावट मद्य आढळून आले तर त्यांची अनुज्ञेप्ती कायम स्वरुपी रह करणेत यावी. त्याच प्रमाणे मद्य बाळगतांना मद्यसेवन, मद्य वाहतुक करतांना अथवा मद्यविक्री करतांना किंवा आपल्या जागेचा वापर अवैद्य ढाबा चालविणेसाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच बनावट ताडी विक्रेत्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच उत्पादन शुल्क विभागाकडून आपल्या अखत्यारीत असलेले सर्व परिसरातील दारु व ताडी बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येवुन नागरिकांची आरोग्याचे होणारे नुकसान व शासनाची होणारी फसवणुक त्वरीत थांबविण्यात यावी म्हणून हे निवेदन आहे. सदरील निवेदनाची दखल घ्यावी. निवेदनाची दखल न घेतली गेल्यास मानव विकास पत्रकार संघातर्फे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.


यावेळी डॉ. प्रदीप पवार संस्थापक अध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ संपादक मानव आयोग वृत्तपत्र, वसीम खाटीक प्रदेशाध्यक्ष मानव विकास पत्रकार संघ संपादक खानदेशी लीडर वृत्तपत्र, बी. व्ही. गिरासे विभागीय सचिव, पंडित निकम विभागीय उपाध्यक्ष, रोशनसिंग झाल्टे जिल्हाध्यक्ष धुळे, ज्ञानेश्वर पावरा जिल्हा सचिव धुळे,इमरान पठाण अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष धुळे,कैलास राजपूत तालुकाध्यक्ष, राधेश्याम पावरा शिरपूर तालुका उपाध्यक्ष, दिलीप पाटील जिल्हा उपाध्यक्ष धुळे, भटु धनगर शिरपूर शहरध्यक्ष,संतोष चौधरी सदस्य, अरुण कांबळे सदस्य, जंदलाल बडगुजर सदस्य शिरपूर, साबीर मनेर सदस्य शिरपूर, बिस्मिल्ला शहा सदस्य शिरपूर, श्याम चांदे सदस्य शिरपूर, एकनाथ वाघ सल्लागार मानव विकास पत्रकार संघ, जितेंद्र देवरे सदस्य, प्रमोद राठोड सदस्य बबळाज, मनोहर वाघ शिरपूर, अशपाक मिर्झा सदस्य शिरपूर, प्रदीप पाटील सदस्य, दिनेश शंभू कोळी अंतर्ली, बळीराम बंजारा बबळाज, मुकेश पावरा सदस्य भोईटी, मोतीराम पावरा सदस्य भोईटी, पत्रकार शेख इमरान शेख रफीक शिरपूर, संपादक सुनील सुर्यवंशी शिरपूर, दिलीप पाटील ताजपुरी. व मानव विकास पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.