अवैधरित्या सुरु असलेल्या गौण खनिज (वाळू, मुरुम) हे तात्काळ थांबविणे, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येणार ……

एरंडोल तालुक्यातील अवैधरित्या सुरु असलेल्या गौण खनिज (वाळू, मुरुम) हे तात्काळ ८ दिवसाचे आत थांबविणे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येणार ……

एरंडोल तालुक्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात गौण खनिज व अवैध वाळू उपसा सुरु असून त्यांची सर्रासपणे विक्री होत आहे. सदरील अवैध वाळू ही उत्राण, हनुमंत खेडे, म्हसावद, नागदुली, रवंजे, सुकेश्वर, कढौली, वैजनाथ, टाकरखेडा, भातखेडे इ. गावातून मोठ्या प्रमाणात गिरणा नदीच्या पात्रातून अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या मार्फत वाळू काढण्यात येत असून त्यामुळे या पात्रातील नदीचे पात्र हे खोल गेलेले आहे.

नदीपात्रात भरपूर पाणी जमा असल्याने वाळू माफीया यांना नदीपात्रातून लिजांकडून वाळू उपसा करणे शक्यच होत नाही. त्यामुळे संबंधित वाळू माफिया यांनी तहसिल कार्यालय, विंडशक्कल लढविलेली असून सदरील वाळू माफिया हे इलेक्ट्रॉनिक मशीनच्या (आ/जा) सहाय्याने रात्रीच्या सुमारास साधारणत रात्री ८.०० ते सकाळी ५.०० या वेळेमध्ये वेसुमारपणे वाळूचे उपसा करुन त्याची मोठ्या हायवा डंम्परने ते रातोरात वाहतूक करुन विल्हेवाट लावीत आहे, असा हा गैरप्रकार वाळू माफिया हे संबंधित विभागाचे अधिकारी

वर्ग, तलाठी, मंडळाधिकारी, तहसिलदार, प्रांत, प्रांताधिकारी या सर्वांना हाताशी धरुन राजेरोसपणे करीत आहेत. तसेच महोदय साहेव आपणास ही देखील विनंती केली जात आहे की, वरील दोन्ही ठिकाणी तात्काळ महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचे पथक रात्र-दिवस बंदोबस्तासाठी थांबविण्यात यावे जेणेकरुन होत असलेला वाळू उपसाला आळा बसेल.

तसेच महत्वाचे म्हणजे अवैधरित्या होत असलेल्या वाळू उपसामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे विहीरीच्या पाण्याची पातळी खूपच खाली गेलेली असून अशीच परिस्थीती जर अजून १ ते २ वर्ष राहिली तर भविष्यात सर्व शेतकरी बांधवांना त्यांचे पिकांसाठी पाणीच विहीरींमध्ये राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच उत्राण, हनुमंत खेडे, म्हसावद, नागदुली, रवंजे, सुकेश्वर, कढोली, वैजनाथ, टाकरखेडा, भातखेडे या गावांना पिण्याचे पाणी येथून पुरविले जाते. सध्या प्रधानमंत्री जलमिशन योजना अंतर्गत त्याठिकाणाहून वरील गावांना पाणी पुरविणेबाबतचे काम सुरु आहे. परंतु त्याठिकाणाहूनच वाळू माफिया हे मोठ्या प्रमाणात वाळूची उचल करीत असल्याने तेथे पाण्याचा साठाच शिल्लक राहणार नाही, तरी संबंधित गावांना पाणी कसे पुरविले जाईल ? हा मोठा गंभीर प्रश्न आहे.

तसेच या अवैधरित्या मोठ्या डंम्परने होत असलेल्या वाळू वाहतुक मुळे शेतरस्त्याचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना बैलगाडीचा रस्ता हा खूपच त्रासदायक झालेला आहे. या वाहतूकीमुळे भविष्यात याठिकाणी एखाद्या वेळी मोठी जिवीतहानी होण्याची घटना घडण्याची दाट शक्यता आहे. उत्राण, हनुमंत खेडे, म्हसावद, नागदुली, रवंजे, सुकेश्वर, कढोली, वैजनाथ, टाकरखेडा, भातखेडे गावावरुन जाणारे शाळेकरी विद्यार्थी सायकलीने वापरीत असतात व याच रस्त्यावर वाळू वाहतूक करणारे डंम्पर, हायवा डंम्पर, ट्रॅक्टर या वाहनांतून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जात असल्याने ते वाहने जोराने चालतात व रस्त्यावर सायकलीने शाळकरी विद्यार्थी वापरत असल्याने एखाद्या वेळेस शाळकरी विद्यार्थ्यांचा या वाहनाद्वारे अपघात होण्याची देखील दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

महोदय साहेब संबंधित अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या गाड्यावर कुठल्याही प्रकारेच नेम प्लेट नसतात. त्यामुळे संबंधित लोक हे मोठ्या प्रमाणात जोराने आपली वाहने रस्त्यावरुन ने-आण करीत असतात. तसेच अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाल्यावर देखील संबंधिता विरुध्द काही एक कारवाई / गुन्हा नोंदविला जात नाही. कारण या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे वर पर्यंत हात असल्याचे ते बोलून दाखवित असतात. तसेच संबंधितांचे वाहन वगैरे जर एखाद्या वेळी अडविण्यात आले तर संबंधितावर सदरील महसूल विभागाचे कर्मचारी हे थातूर-मातूर प्रमाणात कारवाई करुन पंचनामा करुन सदरील वाहने सोडून देत असतात. यामुळे यांची मोठ्या प्रमाणावर मुजोरी व दहशत वाढलेली आहे.

तरी आपणास विनंती की, संबंधित अवैधरित्या वाळू उपसा व गौण खनिज यांचेवर तात्काळ ८ दिवसाचे आत योग्य ती कारवाई होऊन सदरील अवैधरित्या होत असलेली वाळू वाहतूक थांबविण्यात न आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठ (८) दिवसानंतर शेतकरी, स्थानिक नागरीक व शाळकरी विद्यार्थी यांना सोबत घेऊन तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडणार असून यादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी महसूल प्रशासनास जबाबदार राहील याची कृपया दखल घ्यावी ही विनंती.

निवेदन देतेवेळी एरंडोल तालुका अध्यक्ष विशाल सोनार, सहकार सेनेचे जिल्हा संघटक ज्ञानू पाटील, जगदीश सुतार, तालुका उपाध्यक्ष निंबा पाटील, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष संदीप राठोड उपस्थित होते.

  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..