मनपा हद्दगीर गट नं. १५५९ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि परिसर विकासाचे काम लवकर मार्गी लावण्याची मागणी!

मनपा हद्दगीर गट नं. १५५९ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि परिसर विकासाचे काम लवकर मार्गी लावण्याची मागणी!

​जळगाव-(प्रतिनिधी) – शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी जळगाव महानगरपालिकेच्या हद्दगीर गट नंबर १५५९ सिटी सर्व्हे क्र. १६६२ बेरडशेट सोसायटी समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण तसेच परिसराचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव जळगाव समितीचे अध्यक्ष श्री. आशिष उत्तमराव सपकाळे यांनी केली आहे.

​या संदर्भात, त्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना दिनांक १७/१०/२०२३ रोजी निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण असते. परंतु, याच भागात काही समाजकंटकांनी पुतळ्याच्या परिसराचे विद्रुपीकरण केले होते, ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता.
​यावर तातडीने कार्यवाही करत जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्तांनी लक्ष घालून या जागेवरील सुशोभीकरणाचे आणि परिसराच्या विकासाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

​ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या कार्याची आठवण ताजी होते, त्या ठिकाणी सुशोभीकरण आणि विकास होणे आवश्यक आहे. या मागणीमुळे जळगाव शहराच्या सौंदर्यात भर पडेल आणि नागरिकांच्या भावनांचा आदर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ​डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष उत्तमराव सपकाळे, सल्लागार सतीश गायकवाड, उपाध्यक्ष भारती रंधे, सचिव निलू इंगळे, तृषाल सोनवणे, कार्यदक्ष सचिन सरकटे, जितेंद्र केदार, राज कोळी, अभिजीत रंधे, राजू डोंगरे, मिलिंद शिरसाट, दिपक सोनवणे, मंगल भालेराव, सल्लागार हरिश्चंद्र सोनवणे, कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.