शिक्षणाचा अधिकार हिरावला जाणार नाही — महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ठाम भूमिका…

शिक्षणाचा अधिकार हिरावला जाणार नाही — महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ठाम भूमिका पाचोरा शहरातील शारदा इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षण घेणारे दोन सख्या भाऊ उबेद फिरोज खाटीक (वर्ग ४, वय १० वर्षे) आणि हमजा फिरोज खाटीक (वर्ग २, वय ८ वर्षे) या विद्यार्थ्यांना फी थकबाकी असल्याच्या कारणास्तव परीक्षेला बसू देण्यात आले नाही अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोघांच्या आईची तब्येत गंभीर असून त्या किडनी फेल्युअरने त्रस्त आहेत. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा वेळी शाळेने विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क हिरावून घेतला, ही गोष्ट निंदनीय आहे.

या अन्यायाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष श्री. श्रीकृष्ण विठ्ठल दुंदुले यांनी गटशिक्षणाधिकारी, पाचोरा तालुका यांच्याकडे लिखित तक्रार दाखल केली असून संबंधित शाळा प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सेनेच्या निवेदनात म्हटले आहे की  “शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येक भारतीय मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे. फी थकबाकीच्या कारणावरून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे संविधानाच्या कलम 21(A) आणि शिक्षणाचा अधिकार कायद्याचे उल्लंघन आहे. समाजातील गरीब व आजारग्रस्त कुटुंबांप्रती शाळांनी संवेदनशीलता दाखवावी हीच आमची अपेक्षा.”

विद्यार्थी सेनेने यापुढेही अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठामपणे उभे राहण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष श्री कृष्णा दुंदुले, मनसे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, शहराध्यक्ष ऋषिकेश भोई, मनविसे शहराध्यक्ष निलेश मराठे, शहर सचिव वाल्मीक जगताप, व पालक वर्ग पदाधिकारी उपस्थित होते…

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.