जळगाव : सरकारने गोरगरीब कुटुंबासाठी सण व उत्सव आनंदात साजरे करता यावे यासाठी आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली होती, या योजनेच्या किटमध्ये साखर, तेल, रवा, मैदा, हरभरा दाळ या सर्व वस्तु १०० रुपयात मिळत होत्या, त्यामुळे सणासुदीच्या काळात गरिबांचा आनंद द्विगुणित होण्यास मदत मिळत होती, परंतु सदर योजनेचा लाभ यावर्षी न मिळाल्याने गरिबांच्या आनंदावर विरजण टाकण्याचे काम या सरकारने केले आहे, या योजनेचा भविष्यकाळ न ठरवता फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सदर योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता का?

कोणत्याही योजनेचा जनतेला वर्षानुवर्षे लाभ मिळावा या हेतूने योजना अमलात आणल्या जातात परंतु गेल्या वर्षभरापासून सदर योजनेचा लाभ का दिला जात नाही आहे? असे प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. महाराष्ट्रासोबत आपल्या जळगाव जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टीचा सामना अनेक कुटुंबांना करावा लागला आहे, घरातील धान्याची नासाडी झाली आहे व अनेक संसारउपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासधूस झालेली आहे, गरिब व सर्वसामान्य कुटूबांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे, तरी सदर काळात संकटात सापडलेल्या जनतेला या योजनेचा मोठा दिलासा मिळू शकतो, अशा वेळी दिवाळीसाठी आनंदाचा शिधा पुरवला गेला तर खरच दिवाळी आनंदात जाईल, त्यामुळे या योजेनेला सरकारने दिवाळीच्या अगोदर लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा ही आपणास या निवेदनाव्दारे विनंती. महानगरध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना, अविनाश पाटील उपमहानगरध्यक्ष राजेंद्र निकम, उपमहानगरध्यक्ष ललित शर्मा, उपमहानगरध्यक्ष प्रकाश जोशी, शाखा अध्यक्ष अनीता कापुरे, शाखा उपाध्यक्ष लक्ष्मी भिल, तालुका संघटक विलास सोनार, तालुका सचिव मनोज लोहार, हर्षल वाणी









