जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली आदेश जारी! रोहन घुगे असतील नूतन जिल्हाधिकारी…

महाराष्ट्र शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार भाप्रसे अधिकारी श्री. रोहन घुगे यांची जिल्हा परिषद, ठाणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून बदली करून त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, जळगाव या पदावर करण्यात आली आहे. ही बदली वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी अ.शा.प.क्र. एईओ-११२५/५/२०२५/भाप्रसे-१ या क्रमांकाने आज (दि. ७ ऑक्टोबर २०२५) आदेश निर्गमित केला आहे. या आदेशावर अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार, श्री. घुगे यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सुपूर्द करून, जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार श्री. आयुष प्रसाद, भाप्रसे यांच्याकडून त्वरित स्वीकारावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, बदलीनंतर रूजू अहवाल Supremo प्रणालीवर (ER Sheet मधील Posting कॉलममध्ये) अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यभार हस्तांतरण करताना शासनाने दिनांक १७ नोव्हेंबर २०२० रोजी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही नमूद केले आहे. नवीन पदावर रूजू झाल्यानंतर पूर्वीच्या पदावरील अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल व कार्यमूल्यांकन अहवाल विहीत वेळेत लिहावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने या आदेशाची प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी महसूल व वन विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, नाशिक व कोकण विभागीय आयुक्त, तसेच आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव) आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय यांना पाठवली आहे.

या आदेशाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव कार्यालयांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे. रोहन घुगे यांच्या ठाणे येथील कार्यकाळात त्यांनी प्रशासनिक पातळीवर अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. आता ते जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार असून, त्यांच्या नवीन कार्यकाळाकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.