भविष्य निर्वाह कार्यालयामार्फत पाठवलेले इंग्लीश भाषेतील पत्र मराठीत पाठवावे, मनसेचे निवेदन….

भविष्य निर्वाह कार्यालयामार्फत पाठवलेले इंग्लीश भाषेतील पत्र मराठीत पाठवावे, मनसेचे निवेदन….

विविध कंपन्या व कारखान्यांमधील कामगार व तरुणांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्या कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनावर आपण दिलेले उत्तर संपूर्णपणे इंग्रजी भाषेत असून, ते बहुतांश कामगार वर्गासाठी अपठनीय व अवघड आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक ३० मार्च २०१५ रोजीचा शासन निर्णय क्रमांक भाषा-२०१४/प्र.क्र.१००/१४/१६ नुसार, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी आपले सर्व व्यवहार व पत्रव्यवहार मराठी भाषेत करावेत असा स्पष्ट आदेश दिलेला आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या भाषा धोरणानुसार मराठी हीच शासकीय व्यवहाराची अधिकृत भाषा आहे. म्हणून, आपल्या कार्यालयामार्फत संबंधित प्रकरणात व इतर सर्व पत्रव्यवहारात मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे.

याबाबत आपले कार्यालय तत्काळ कार्यवाही करून, पूर्वी पाठविलेले इंग्रजी पत्र संपूर्ण मराठी भाषेत पुन्हा देण्यात यावे, ही नम्र पण ठाम विनंती. तसेच पुढील काळात आपल्या कार्यालयातील सर्व पत्रव्यवहार, सार्वजनिक सूचना व कामकाज हे पूर्णपणे मराठी भाषेतच करण्यात यावेत, अशी अपेक्षा व आग्रहपूर्वक मागणी करण्यात येते..

निवेदन देते वेळी उपमहा नगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, राहुल चव्हाण, साजन पाटील, दीपक राठोड, पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.