पारोळा तालुका सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई व पिक विमा भरपाई द्या.

पारोळा तालुका सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई व पिक विमा भरपाई द्या. भिकनराव पाटील. (स्व. शरद जोशी शेतकरी संघटना_तालुकाध्यक्ष)

पारोळा तालुका प्रतिनिधी : पारोळा , खरीप 2025 मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी घाम गाळून व शेती कसुन पूर्व हंगामी लागवड केली. यावर्षी मे महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दणादण उडाली तरीही आलेल्या प्रसंगाला न घाबरता तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपात कापूस, मक्का, ज्वारी, बाजरीची, पेरणी केली जून जुलैमध्ये रुसून बसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे तोंडाचे पाणी पकाले. नंतर ऑगस्ट महिना उजाडल्यावर पावसाने एवढा कहर केला की तालुक्यातील प्रत्येक मंडलामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांची सर्व स्वप्न वाहून गेली. व त्याचे नव्हते झाले. त्यानंतर तर सप्टेंबर मध्ये पावसाने अशी धुवाधार बॅटिंग केली कापसाच्या कैऱ्या सडायला लागल्या मक्का आडवा तिडवा पडला ज्वारी, बाजरी कळी पडली शेतकऱ्यांनी जून महिन्यात काय स्वप्न पाहिले आणि हंगामाच्या शेवटी त्या स्वप्नांचा चुराडा झाला.

शेतीवर सर्व जगाची भुक भागविणाऱ्या माझ्या शेतकरी दादावर निसर्ग एवढा का कोपला याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. निसर्गाच्या ह्या तू
दुचक्रात माझा शेतकरी दादा भरडा ला गेला. एकरी सात ते आठ क्विंटल येणारा कापूस दोन क्विंटल सुद्धा पिकणार नाही आति पावसाने कैऱ्यांच सढल्या नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या कापसावर लाल्या रोग पडला. उरल सुरण सर्व निसर्गाने संपवलं आता जगायचं कसं . हे प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे अख्ख्या जगाला कापसाच्या माध्यमातून वस्त्रे पुरवणाऱ्या माझ्या शेतकरी दादावर अशी वेळ यावी. केवढा ह दैवर्धू विलास तरी महाराष्ट्र शासनाला एकच विनंती आहे की गुंठ्याला पचाऐशी मदत देण्याऐवजी प्रसंगी एन.डी.आर.एफ चे निकष बाजूला ठेवून उदार अंतकरणाने मदत करावी
तसेच पीक कापणी प्रयोगावर आधारित असलेला पीक सुद्धा मंजूर करावा जेणेकरून शासनातर्फे मदतीचा हात मिळावा

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.