कोपरगाव तालुक्यामध्ये माहेगाव देशमुख, सोनेरी धारणगाव वनविभागातून वाळू उपसा जोमात चालू!

कोपरगाव तालुक्यामध्ये गोदावरीचे पाणी कमी होताच पुन्हा एकदा वाळू माफियाने डोकं वर काढले असून महसूल अधिकाऱ्यांना वारंवार केराची टोपली दाखवली जात आहे आज पर्यंत धारणगाव – माहेगाव देशमुख वन विभागात ज्यांच्यावर mpd प्रमाणे गुन्हे दाखल आहे असे संघटित गुन्हेगारी असणारे गुन्हेगार यांनी संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी यांना अँटी करप्शन ची भीती दाखवली जात आहे व अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले जात आहे असे समाज माध्यमात बोलले जात आहे,तसेच या वाळू वाहतुकीमध्ये अनेक अधिकाऱ्यांची देखील हात ओले झाले आहे यामुळे कारवाई होत नाही अशा देखील चर्चांना समाज माध्यमांमध्ये खात्रीशीर चर्चेचा विषय बनला आहे, अश्या अधिकाऱ्यांच्या बे जबाबदार पणा मुळे कोपरगाव तालुक्यात सरास अवैध धंद्यांना उदान आले आहे, वाळू चोरी,वाळू तस्करी, हिरा,गुटका, अवैद्य तस्करी यांना तर सीमा राहिली नाही, यामुळे अश्या संघटित गुन्हेगारांवरती महसूल तसेच पोलीस अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे, तसेच अशा गुन्हेगारांना प्रशासन का घाबरते या विषयी सामाजिक कार्यकर्ते मंगेश औताडे विधानसभेमध्ये या विषयाला गती देण्याचे बोलले जात आहे.










