श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन जिल्हा जळगाव महाराष्ट्र रजि. यांच्या सोबत स्थानिक सामाजिक संस्था श्री विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ, vvss, संघटना, श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था सर्व पदाधिकाऱ्यांनी ओबीसी प्रवर्गातील विश्वकर्मा समाजातील जाती समुहाच्या आरक्षणा विषयक संविधानीक मागण्यांबाबत मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र, राज्य, यांना मा.जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्या मार्फत निवेदन देऊन ओबीसी समाजाला न्याय मिळावा हि मागणी करण्यात आली

यावेळी उपस्थित हर्षल सुर्यवंशी अध्यक्ष श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशन, कार्याध्यक्ष, यशवंत कापडे, सहसचिव, निलेश देवरे, प्रसिद्ध प्रमुख, मिलिंद निकम, सामाजिक कार्यकर्ते, गोपाल रुले, पि.एल.चव्हाण, भगवान वाघ, दिपक खैरनार, भागवत रुले, संजय शिरसाट, आदि.समाजबांधव उपस्थित होते.










