पारोळा येथे बांधकाम कामगार मजुरांचे हाल.

पारोळा तालुका प्रतिनिधी वाल्मीक पाटील पारोळा तालुक्यातील बांधकाम कामगार मजुरांना भांडे वाटप करणे साठी दि.25/8/2025 व 26/8/2025 व असे दोन दिवसांची ऑनलाईन तारीख देण्यात आली होती.त्याप्रमाणे संपूर्ण तालुक्यातील बांधकाम कामगार मजूर त्या तारखांना सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हजर होते.परंतु त्यादिवशी संबंधित विभागाचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी हजर झाले नाही.आणि हजर असलेल्या मजुरांशी कोणत्याही अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधला नाही.आणि त्यांना भुकेले तान्हेले तसेच उन्हात,पावसात संध्याकाळ पर्यंत उभे राहावे लागले.सर्व महिलांचे हरतालिका हे व्रत असल्याने त्यांचे सर्वांचे उपवास होते ,आणि त्यामुळे काही महिलांना चक्कर येऊन खाली पडल्या.आणि त्यासाठी शासनाने कोणत्याही प्रकारची उपाय योजना केली नव्हती.

आणि सर्व बांधकाम कामगार मजूर यांच्या मधून एकच आवाज येत होता की,आम्हाला ज्या तारखा दिल्या आहेत त्या कोणाला विचारून दिल्या आहेत.जर शासनाकडून नियोजन झाले नव्हते,तर लोकांना अशा प्रकारे तारखा का दिल्या.आणि आता आजची आमची ऑनलाईन तारीख गेल्यावर आमचे काय,आम्हाला दुसरी तारीख कशी मिळेल,मिळेल की नाही,आणि मिळाल्यावर सुद्धा परत आमचे असेच हाल होतील का,आणि ह्या सर्व प्रकार संपूर्ण राज्यात घडत आहे .आणि ह्या सर्व प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. हे तर शासन आणि अधिकारी यांनी मजुरांच्या जीवाशी खेळ चालवला आहे.यांना कोणाचीही पर्वा नाही,ते मेले काय आणि राहिले काय.त्यासाठी संबंधित विभागाने याबाबत आपल्या वेबसाईट वर सविस्तर माहिती प्रसिद्ध करावी.आणि योग्य नियोजन करूनच या मजुरांना परत दुसऱ्या तारखा दिल्या जाव्या. आणि तोपर्यंत नव्याने तारखा देणे हे बंद करावे.नाहीतर पारोळा येथे मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्याठिकाणी संतप्त कामगारांनी दिला आहे.








