पारोळा तालुक्यात, पावसामुळे व वादळी वाऱ्यांमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान,
पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील पावसाने काही दिवसांपासून दांडी मारली होती, परंतु 15 ऑगस्ट रात्रीपासून 16 ऑगस्ट रात्रीपर्यंत वादळी वाऱ्यांसह अति मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे कापूस व मका पिकाला धक्काच बसला असून. काही शेतांमध्ये कापूस व मग का पिक वादळी वाऱ्यांमुळे पूर्णपणे आडवे पडून गेल्याने नुकसान झालेले आहे . व कापसाच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. कापसाचे फुलपांद्या आडवे झालेले आहेत व शेतांमध्ये नदी व नाल्यांचे व शेत रस्त्यांचे पाणी शेतांमध्ये आल्याने कापूस पीक पिवळे पडून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असेल त्यांचे पंचनामे करून SDRF प्रमाणे भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी असे आवाहन स्व, शरद जोशी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील तसेच तालुका अध्यक्ष प्रा, भिकनराव पाटील यांनी केले आहे,









