महसूल विभागाच्या नाकावर टिचून कडोली व धानोरा येथून अवैध वाळू उत्खनन सुरू.

महसूल विभागाच्या नाकावर टिचून कडोली व धानोरा येथून अवैध वाळू उत्खनन सुरू.

जळगाव तालुक्यातील मोहाडी धानोरा तसेच एरंडोल तालुक्यातील कोडोली या शिवारातून गिरणा नदी पात्रातून रोज तीस ते चाळीस क्रेन द्वारे वाळू उपसा सुरू आहे.

दरम्यान संबंधित तहसीलदार यांना वारंवार अर्ज करून सुद्धा कारवाई होत नाही यामुळे नागरिकांचा अधिकाऱ्यांवरती रोष आहे. 

प्रशासनाचा असं करत असतील तर आता कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल कोडोली व धानोरा येथल नागरिक करत आहेत.

दरम्यान जळगाव तालुक्यातील तहसीलदार यांना विसर पडलेला असेल की जळगाव तालुका मधून जाणारे गिरणा नदी पात्र आहे या गिरणा पात्र लगतच्या सर्व गावाजवळून बऱ्याच दिवसापासून वाळू उपसा सुरू आहे वारंवार तक्रार करून सुद्धा संबंधित तहसीलदार हे कारवाई करत नाही. 

दक्ष जळगाव वृत्तपत्राचे संपादक यांनी रजिस्टर पोस्टद्वारे मुंबई हायकोर्ट यांना संबंधित गावकऱ्यांच्या सह्या घेऊन लेखी पत्र पाठवलेले होते त्याच दरम्यान माननीय न्यायालयाने जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना पत्राद्वारे उत्तर मागितले होते. 

तरीही माननीय न्यायालय कोर्टाने आदेश दिल्यानुसार सुद्धा संबंधित जिल्हाधिकारी महोदय आणि जळगाव तहसीलदार यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

याचाच अर्थ असा होतो की पाणी कुठेतरी मुरत आहे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये कारवाई होत नाही असं स्पष्टपणे पंचक्रोशीत नागरिकांच्या लक्षात येत असल्याचे दिसत आहे?

Related Posts

दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.