मुंबईत मुसळधार पाऊस; अनेक भागात साचलं पाणी, रस्ते वाहतुक मंदावली, लोकलसेवा विस्कळीत, पाहा A टू Z माहिती.

मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, गोवंडी परिसरात जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली आ मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस (Mumbai Rains) सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम आणि मध्य उपनगरांना पावसाने आज (21 जुलै) पहाटेपासूनच झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय. घाटकोपर रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना  दोन ते तीन फूट पाण्यातून प्रवास करावा लागतोय.

मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, गोवंडी परिसरात जोरदार पाऊस कोसळतो आहे. यामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. साकीनाका मेट्रो परिसरातील रस्ते जलमय झालेत. वाहनचालकांना पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागतेय. दरम्यान, पश्चिम रेल्वेवरील (Mumbai Local Trains Updates) फास्ट लोकल 10-12 मिनिटे उशिराने धावत आहे. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद- मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम उपनगरात आज सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी-पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. बोरिवलीकडून वांद्रे चे दिशेने जाणारा मार्गावर सांताक्रुज विलेपार्ले अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाडदरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर सखलभागात ठिकठिकाणी पाणी भरला आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर गाड्यांचा लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.