रत्नागिरीच्या आरे-वारे समुद्रात चौघे बुडाले, पती पत्नीसहीत ठाण्यातील भावंडांना जलसमाधी.

रत्नागिरीच्या आरे वारे समुद्रात एक दुर्दैवी अपघात झाला. एका जोडप्यासह त्यांच्या दोन लहान भावंडांचा बुडून मृत्यू झाला. हे जोडपे ओसवाल नगरचे होते, तर भावंडे मुंब्राहून पाहुणे म्हणून आले होते. रत्नागिरीमध्ये शनिवारी (19 जुलै) एक दुःखद घटना घडली. आरे वारे समुद्रात बुडून दोन लहान भावंडांसह एका जोडप्याचा मृत्यू झाला. हे जोडपे रत्नागिरीतील ओसवाल नगरचे रहिवासी होते. तर, भावंडे ठाणे मुंब्राहून पाहुणे म्हणून आली होती. पावसाळ्यामुळे समुद्र खवळलेला असताना हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहेरत्नागिरीपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,ठाणेमुंब्राहून उज्मा शेख (१८) आणि उमेरा शेख (२९) रत्नागिरीला नातेवाईकांकडे आले होते. शनिवारी सायंकाळी ते दोघे जैनब काझी (२६) आणि जुनैद काझी (३०) यांच्यासोबत समुद्रावर गेले. हे चौघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. समुद्रात पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या या चौघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते आतमध्ये ओढले गेले आणि समुद्रात बुडाले.या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, स्थानिकांच्या आरडाओरडा लक्षात येताच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे राजेंद्र कदम आणि राजेंद्र यादव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उशिरापर्यंत घटनेची नोंदणी केली. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे.दुपारपासून रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला आहे. अशा स्थितीत रत्नागिरी शहराजवळील आरे वारे समुद्रात चौघेजण बुडाल्याची ही दुर्घटना घडली. सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत ठाणे मुंब्रा येथे झालेल्या दोन भावंडांचाही समावेश आहे. रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर येथे राहणाऱ्या पती-पत्नीचा ही यामध्ये समावेश आहे.

या घटनेमुळे रत्नागिरी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करून पुढील कार्यवाहीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.दुसरीकडे, रायगडातपर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा मुरुड तालुक्यातील फणसाड धरण येथे बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, खालापूर तालुक्यातील लोधीवली येथील पाझर तलावात गोवंडी येथून आलेल्या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीआहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.