ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्यांना पाच ते सहा तास उशीर, ‘या’ रेल्वेंचा मार्ग बदलला.

देवळाली (Deolali) ते नाशिक (Nashik) दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर ही घडली घटना आहे. ही घटना घडण्याच्या थोड्यावेळा अगोदरच अस्वली ते पाडळी दरम्यान सुद्धा ओव्हरहेड वायर तुटली होती. तेथील काम पूर्ण झाल्यावर नाशिकरोडजवळ वायर तुटली. सध्या रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या प्रकाराने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली असून चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत. या बिघाडामुळे 11113 देवळाली – नाशिक पॅसेंजर ही गाडी प्रवासासाठी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. तर इतर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

वळविण्यात आलेल्या गाड्या (Diverted Trains)  – 20103 लोकमान्य टिळक टर्मिनस – आझमगढ ही गाडी आज BSR-ST-JL-BSL- KNW मार्गे वळवण्यात आली आहे. – 12859 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा ही गाडी BSR-ST-JL-BSL-नागपूर मार्गे धावणार आहे. – 22129 लोकमान्य टिळक टर्मिनस BSR – ST – JL – BSL – KNW अयोध्या कैंट मार्गे वळविण्यात आली आहे.  – 22223 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – शिर्डी साईनगर ही गाडी कळवा – लोणावळा – पुणे – डौंड छावणी – शिर्डी साईनगर मार्गे वळवण्यात आली आहे. या गाड्यांच्या वेळेत बदल (Rescheduling)  – 17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नांदेड पूर्वनिर्धारित वेळ: 05.30 वाजता होती. आता 08.30 वाजता प्रस्थान केले आहे.  – 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर  पूर्वनिर्धारित वेळ: 06.35 वाजता, आता 10.00 वाजता प्रस्थान करणार आहे.    मुंबईत आज मेगाब्लॉक, लोकल सेवांवर परिणाम आज मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि हार्बर मार्गवर मेगाब्लॉक असणार आहे. यामध्ये सीएसएमटी ते वांद्रे आणि चुनाभट्टी पर्यंतच्या मार्गावर सेवा प्रभावित होईल. तसेच, पश्चिम रेल्वेच्या मुख्य मार्गावर गोरेगाव ते बोरिवली पर्यंत सकाळी 10 ते 3 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कामे करण्यासाठी ब्लॉक घेतला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.